मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे कायमच त्यांच्या नात्यामुळं माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. अशी ही बहुचर्चित सेलिब्रिटी जोडी नुकतीच एका अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळाली. मुंबई कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या काही निर्बंधांची अंमलबजावणी सुरु असतानाच दिशा आणि टायगर मात्र त्यांच्या कारमधून ड्राईव्हसाठी निघाले होते. पण, ही ड्राईव्ह त्यांना काहीशी अडचणीत टाकून गेली. 


'ईटी टाईम्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार वांद्रे येथे कारमधून फेरी मारत असताना मुंबई पोलिसांनी दिशा आणि टायगरला थांबवलं. वांद्रे बँडस्टँड परिसरात दुसऱ्यांदा फेरी मारत असताना या बहुचर्चित सेलिब्रिटी कपलला पोलिसांनी हटकलं. जिम सेशननंतर कारमधू या भागात फेरी मारत असतानाच त्यांना पोलिसांनी अडवल्याची माहिती समोर येत आहे. 




टायगर कारमध्ये मागच्या आसनावर बसला होता, तर दिशा पुढे बसली होती. परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडल्यामुळं काही कारवाई आणि आधार कार्डची तपासणी केल्यानंतर या जोडीला पोलिसांनी लगेचच सो़डलं. त्यामुळं पुढे या प्रकरणाला फारसा वाव मिळाला नाही. 






दरम्यान, कामाच्या बाबतीत सांगावं तर, दिशा हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'राधे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेता सलमान खान याच्यासोबत तिनं स्क्रीन शेअर केली होती. येत्या काळात दिशा एकता कपूर हिच्या KTina  या चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'व्हिलन 2' हा चित्रपटही तिच्या हाती असल्याचं कळत आहे. तर टायगर येत्या काळात 'हिरोपंती 2', 'गणपत' आणि 'बाघी 4 ' या चित्रपटांतून चाहत्यांची भेट घेणार आहे, असं म्हटलं जात आहे.