Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूड (Bollywood) म्हणजे, स्टार कीड्सचं हक्काचा करिअर ऑप्शन असं म्हटलं जातं... पण असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यानं या समजाचं गैरसमजात रुपांतर केलं. असंच एक नाव अभिनेता विजय राज. या अवलियानं आपल्या प्रतिभेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. तब्बल 20 वर्षांपासून आपल्या अभिनयानं ग्लॅमरस जगतावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यानं अगदी गँगस्टरपासून ते कॉमेडीपर्यंत सर्व भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांना न्यायही दिला आहे.
उदयपूर हत्याकांडावर आधारित 'उदयपूर फाईल्स' सिनेमात अभिनेता विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण, तुम्हाला माहितीय का? विजय राजचं खरं आयुष्यही फारच रंजक आहे. विजय राजला एकेकाळी त्याच्या सडपातळ शरीराची लाज वाटायची आणि त्यासोबतच वजन वाढवण्यासाठी तो औषधंही घेत होता. पण, त्याचं शारीरिक स्वरुप अधिक आकर्षक बनवण्यासाठी विजय राजला त्याचं वजन वाढवायचं होतं. ही कहाणी विजय राजचा जवळचा मित्र नवाजुद्दीन सिद्दीकी यानं एका मुलाखतीत दिलेली.
विजय राज वजन वाढवण्यासाठी औषधं खायचा
विजय राजचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला आणि त्यानं त्याचं बालपण दिल्लीत घालवलं. शाळेत असल्यापासूनच त्याला नाटक आणि सिनेसृष्टीत त्याचं भविष्य दिसायला लागलं. त्यानंतर विजय राजनं पथनाट्य केली. त्यानंतर कालांतरानं त्याला रंगभूमी गाजवण्याची संधी मिळाली.
यासोबतच त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांसोबतही खूप संघर्ष केला. जेव्हा विजय राजला वाटलं की, त्याला चित्रपटांमध्ये नाव कमवायचंय, तेव्हा तो मुंबईत आला. त्यानंतर त्यानं खूप स्ट्रगल केलं. अनेक सिनेमांमध्ये कामंही केलं. पण, 'मान्सून वेडिंग' सिनेमानं विजय राजला ओळख मिळवून दिली. विजय राजला सिनेसृष्टीत प्रवेश मिळाला आणि त्याला भूमिका मिळू लागल्या. पण, एक गोष्ट विजय राजला सतत त्रास देत होती आणि ती म्हणजे, त्याचा सडपातळ देह. दरम्यान, त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याला खूप काम मिळालं आणि आतापर्यंत त्यानं 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाहीतर विजय राजनं वजन वाढवण्यासाठी औषधं घेतली.
नवाजुद्दीन सिद्दीकीनं सांगितलेला 'तो' किस्सा
गेल्या वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीनं समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "एक काळ असा होता जेव्हा आम्ही खूप बारीक होतो आणि वजन वाढवण्याचा खूप प्रयत्न करायचो. विजय राज आणि मी दोघांनाही वजन वाढवायचं होतं, पण ते वाढत नव्हतं. म्हणून एक दिवस त्यानं (विजय राजनं) मला काही गोळ्या दिल्या आणि सांगितलं की, जर तू या गोळ्या खाल्ल्यास तर तू जाड होशील. त्यानंतर मी गोळ्या घेऊ लागलो आणि माझं वजनही वाढलं. पण, त्यानंतर मी औषधं घेणं बंद केलं आणि त्यानंतर माझं वजन पुन्हा कमी झालं."
विजय राज आणि नवाजुद्दीन सिद्दीकी
मुलाखतीत हे उघड केले होते. नवाजुद्दीन म्हणतो, "एक काळ असा होता जेव्हा आम्ही खूप बारीक होतो आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. विजय राज आणि मी दोघांनाही वजन वाढवायचे होते पण ते वाढत नव्हते. म्हणून एके दिवशी त्याने (विजय राज) मला काही गोळ्या दिल्या आणि सांगितले की जर तू या खाल्ल्यास तू जाड होशील. त्यानंतर मी गोळ्या घेऊ लागलो आणि माझे वजनही वाढले. पण नंतर मी गोळ्या घेणे बंद केले आणि माझे वजन पुन्हा वाढले." दरम्यान, विजय राज आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे चांगले मित्र आहेत आणि दोघांनीही दिल्लीत एकत्र थिएटर केले आहे. ते दोघेही आता चित्रपटसृष्टीत दिग्गज बनले आहेत.
विजयराज उदयपूर हत्याकांडाची कहाणी
आता विजय राज लवकरच 'उदयपूर हत्याकांड'ची कहाणी पडद्यावर आणत आहेत. या चित्रपटाचं नाव 'उदयपूर फाईल्स' आहे आणि ही कन्हैया टेलरची कहाणी आहे. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे आणि तो 11 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबतही गोंधळ दिसून येत आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. आता या चित्रपटावर निषेधाचा किती परिणाम होतो हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :