R Madhvan On Sai Tamhankar : काही दिवसांपूर्वी व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकरनं पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असल्याचं तिच्या प्रेक्षकांना सांगितलं आता अभिनयाच्या सोबतीनं सई करीयरची वेगळी वाट म्हणून 'पॅराग्लायडिंग पायलट' बनली आहे. प्रेक्षकांनी तिच्या नव्या प्रवासाला तर शुभेच्छा दिल्या, पण अगदी बॉलिवूड मधल्या काही बड्या स्टार्सनी तिच्या या खास कृत्याचं कौतुक केलं आहे. सईनं सोशल मीडियावर तिच्या पॅराग्लायडिंगचा एक खास व्हिडीओ शेयर केला. हे तिचं पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाईंग होत सईची जिद्द कमालीची आहे आणि तिच्या मित्र मंडळीनं देखील आता तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देऊन तिचं खास कौतुक केलं आहे.
नव्या वर्षाची नव्या करीयर सोबत सईनं सुरुवात केली आणि पायलट म्हणून तिचा हा प्रवास तिला समृद्ध संपन्न अनुभव देऊन जाणारा आहे, असं देखील सईनं म्हटलं होत. आकाशावर मनापासून प्रेम करणारी सई आता चक्क आकाशाला गवसणी घालताना दिसतेय.
सईनं आणखी एक इन्स्टा पोस्ट केली असून या पोस्टमध्ये तिनं अवकाशात झेप घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याबाबत बोलताना सई ताम्हणकर म्हणते की, ""प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं !". तसेच, सईनं हा प्रवास खूपच रोमांचक असल्याचंही म्हटलं आहे.
यावेळी लेटेस्ट पोस्टमध्ये तिनं अवकाशात झेप घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि सई म्हणते "प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं ! सईने हा प्रवास खूपच रोमांचक, शुद्ध आणि पूर्णत्व देणारा असल्याचे देखील म्हटलं आहे.
दरम्यान, सईच्या या व्हिडीओवर बॉलिवुड अभिनेता आर माधवन गायक विशाल दादलानी , शाल्मली खोलगडे यांच्या सोबतीने तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :