मुंबई : आई आणि मुलाचं नातं हे अवघ्या काही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. पण, ते व्यक्त करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कायमच सर्वांची मनं जिंकतात. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्यानं अशाच प्रकारे त्याचं आणि त्याच्या आईचं नातं सर्वांसमोर आणलं आहे. हा अभिनेता म्हणजे प्रतिक बब्बर. 

प्रतिकनं आजवर कायमच त्याची आई, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावरील त्याचं प्रेम बहुविध परिंनी व्यक्त केलं आहे. प्रतिकच्या जन्मानंतर फार कमी कालावधीतच स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनामुळं निर्माण झालेली पोकळी प्रतिकच्या जीवनात भरुन निघाली नाही. पण, त्यानं कायमच आईच्या आठवणींना आपल्या जीवनात मानाचं स्थान दिलं. 

Wedding Album : विवाहबंधनात अडकली  'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री  

नुकतंच प्रतिकनं शब्दश: त्याच्या आईचं म्हणजेच स्मिता पाटील यांचं नाव त्याच्या हृदयावर कोरलं आहे, स्मिता अशा नावाचा टॅट्टू त्यानं छातीवर डाव्या बाजूला कोरून घेतला आहे. 'स्मिता फॉरएव्हर' असं कॅप्शन लिहित त्यानं याबाबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आईखातर प्रतिकनं उचललेलं हे पाऊल सध्या सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. 

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिकनं त्याची टॅट्टू काढण्यासाठीची इच्छा होती हे स्पष्ट केलं. 'मला कायमच आईचं नाव असणारा टॅट्टू काढायचा होता. मी कायमत या क्षणाच्या प्रतिक्षेत होतो, अखेर तो योग्य क्षण आला. जिथे तिची योग्य जागा होती, तिथेच तिचं नाव कोरलं गेलं. 1955 हे वर्ष तिचं जन्मवर्ष दर्शवतं तर ती माझ्यासोबत चिरंतन असेल असं त्यापुढे असणारं चिन्हं दर्शवतं', असं तो म्हणाला.