Bollywood Actor Piyush Mishra: बॉलीवूड अभिनेता पियूष मिश्रा (Piyush Mishra) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत केलेल्या खुलाशांमुळे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची एकच चर्चा सुरु आहे. अभिनेता-लेखक पियूष मिश्रा यांना कधी काळी दारूचे व्यसन होते. या सवयीमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झालेला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दारूसोबतच्या आपल्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. या व्यसनाच्या विळख्यात ते पूर्णपणे अडकलेले. इतके की, दुरूच्या नशेत धूत होऊन अनेक महिलांना त्यांनी अश्लील फोन केले. आईला शिवीगाळ केली. एखादं व्यसन कसं हळूहळू माणसावर हावी होत जातं याबद्दलही त्यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले. (Bollywood Actor)
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले, “एक वेळ अशी येते की तुम्हाला वाटू लागतं की दारू पिणं कसं आवश्यक आहे. त्याचा परिणाम असा होतो की माणूस अधिकाधिक पिण्याकडे वळतो. दारूचे व्यसन ही जीवघेणी सवय आहे... एक वेळ अशी येते की तुम्ही पिण्याची इच्छा असो वा नसो, शरीराला दारूची गरज भासते. मी स्वतः हे अनुभवलं आहे.”
अनेक महिलांना अश्लील फोन
ते म्हणाले, “दारू पिल्यानंतर मी अनेक अशा गोष्टी केल्या, ज्या नंतर मला स्वतःलाच पटत नव्हत्या. माझे आईसोबतचे संबंध खूपच बिघडले होते. नशेत मी त्यांना खूप दुखावणाऱ्या गोष्टी बोललो… जरी मला माहिती होतं की मला त्यांना माफ करायला हवं.” त्यांनी हेही कबूल केले की, मी अनेक महिलांना फोनवर चुकीच्या आणि अश्लील गोष्टी सांगितल्या, आणि दुसऱ्या दिवशी मला त्याबद्दल काहीही आठवत नव्हतं. त्या वेळी माझ्यावर माझाच ताबा नव्हता. मी जे करत होतो, ते मला करायचं नव्हतं.”
डोक्यात सतत दारूचा विचार
ते म्हणाले,“एक वेळ अशी येते की तुम्हाला वाटू लागते की दारू पिणे गरजेचे आहे. याचा परिणाम असा होतो की माणूस अजून जास्त पिण्याकडे वळतो. दारूचे व्यसन एक गंभीर आजार आहे आणि व्यसनी व्यक्तीला स्वतःलाच कळत नाही की तो व्यसनी आहे. एक वेळ अशी येते की तुम्ही पिण्याची इच्छा असो वा नसो, शरीराला दारूची गरज भासते. मी स्वतः हे अनुभवलं आहे.”
“मी कधीही दारू पिऊन अभिनय केला नाही किंवा नशेत सेटवर गेलो नाही. पण दारूने माझ्या आयुष्यावर परिणाम नक्कीच केला. माझ्या डोक्यात सतत दारूच असायची. ‘हुस्ना’ गाणं गाताना आणि ‘गुलाल’वर काम करतानाही माझ्या मनात दारूच होती. पण त्या वेळी मी प्रत्यक्षात दारू प्यायलेली नव्हती. मी फक्त क्रेविंगमुळे पित होतो, आणि ती आवरता येत नव्हती.”
या साधनांमुळे दारूची तल्लफ कमी झाली
पियूष मिश्रा यांनी पुढे सांगितले की, या व्यसनाचा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यावरही परिणाम झाला. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यासोबत काम करणे कठीण वाटू लागले. या काळात त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आणि त्यांनी स्वतःमध्ये बदल केल्याचे सतत स्पष्ट करावे लागत होते, जे त्यांच्यासाठी खूप थकवणारे होते. 2009 साली त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. या घटनेनंतर त्यांनी आपल्या परिस्थितीकडे अधिक गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विपश्यना सारख्या आध्यात्मिक साधनांचा अवलंब करून व्यसनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, या साधनांमुळे त्यांची दारूची तल्लफ कमी झाली. जरी त्यांनी दारू पूर्णपणे सोडलेली नसली तरी, त्यांनी त्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे.
पियूष मिश्रा याचं वर्क फ्रंट
पियूष मिश्रा अलीकडेच ‘राहु केतु’ या कॉमेडी चित्रपटात दिसले. या चित्रपटात त्यांनी पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांच्यासोबत सहाय्यक भूमिका साकारली. याआधी ते ‘क्रेजी’ (2025) या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या पात्राला आवाज दिला होता. तसेच ते ‘आजाद’ (2025) मध्येही झळकले होते. चित्रपटांसोबतच ते नाटक आणि संगीत क्षेत्रातही सक्रिय आहेत.
