मुंबई : कलाकार हे त्याच्या चित्रपटासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळंही अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सेलिब्रिटी जोड्यांबाबतच तर, चाहत्यांना कमालीचं कुतूहल. आजवर हिंदी चित्रपट जगतानं अनेक सेलिब्रिटींची नाती आकारस येताना आणि ती दुरावतानाही पाहिली. खासगी जीवनातील हे टप्पे ओलांडत कित्येकांनी एक नवी सुरुवाच केली. असं असलं तरीही काही चर्चांना मात्र पूर्णविराम कधीही लागला नाही. अशीच एक चर्चा म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या तथाकथित प्रेमप्रकरणाची.

Continues below advertisement


अभिनेत्री रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन या दोन्ही कलाकारांनी 'सिलसिला' या चित्रपटात एकत्र शेवटचं काम केलं होतं. त्यांच्या नात्याची समीकरणं आजही सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय. हाच चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा संताप अनावर झाला होता.


Video | ऋषभ पंतचं ‘Spiderman Stumping’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल


सूत्रांच्या माहितीनुसार रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सेटवर एकत्र असताना कायमच तणावाचं वातावणर असायचं. खुद्द दिग्दर्शक यश चोप्रासुद्धा सारंकाही सुरळीत पार पडो, अशीच प्रार्थना करत रहायचे. तिथं रेखाही कॅमेरामनला सांगितल्यानुसार एकाच टेकमध्ये शॉट देऊन त्या ठिकाणहून निघून जात असत.



असं म्हटलं जातं की हा चित्रपट म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या खासगी जीवनाचंच प्रतिबिंब होता, त्यामुळं रुपेरी पडद्यावर नात्यांचा हा सिलसिला पाहून अमिताभ बच्चन फार संतापले होते. परिणामी असंही म्हटलं जातं की त्यांनी याच कारणामुळं यश चोप्रा यांच्याशी जवळपास 19 वर्षे अबोला धरला होता. यानंतर अनेक वर्षांनी त्यांनी यशराज बॅनरच्या निर्मितीअंतर्गत साकारण्यात आलेल्या 'मोहोब्बते' या चित्रपटात काम केलं होतं.