एक्स्प्लोर

4 तास 19 मिनीटांच्या सिनेमात 33 अभिनेते, पण चित्रपट फ्लॉप ठरला अन् अनेक कलाकारांचं करियर बरबाद झालं

Bollywood : देशासाठी सैनिकांचे प्रेम आणि बलिदान दाखवणारा हा 22 वर्षे जुना चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

Bollywood : आज म्हणजेच 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताच्या विजयाच्या आणि यशाच्या स्मरणार्थ हा दिवस देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीर जवानांना समर्पित असतो. भारतीय सैन्याची अशी शौर्यगाथा अनेकदा मोठ्या पडद्यावरही प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे . मग ते ‘बॉर्डर’ असो किंवा ‘एलओसी कारगिल’. अशा चित्रपटांमध्ये भारतीय सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की एक असा चित्रपट होता, ज्यात 33 कलाकार होते आणि ज्यामध्ये एलओसी कारगिल युद्धाची कहाणी मांडण्यात आली होती? मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

इथे आपण बोलत आहोत ‘एलओसी कारगिल’ या 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्टी-स्टारर चित्रपटाबद्दल. हा चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता, जे युद्धपटांसाठी प्रसिद्ध आहेत. या चित्रपट 4 तास 15 मिनिटांचा होता. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला तो  काळ चित्रपटसृष्टीत खूपच मोठा मानला जातो.

या चित्रपटाची कथा भारतीय सैन्याने कारगिल युद्धात मिळवलेल्या विजयावर आधारित होती. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. 33 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 31 कोटी रुपयांची कमाई केली.

या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगन, सैफ अली खान, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, नागार्जुन, अक्षय खन्ना, मनोज बाजपेयी, आशुतोष राणा, सुदेश बेरी, राज बब्बर, मोहनीश बहल, अवतार गिल यांसारखे अनेक मोठे कलाकार होते. याशिवाय राणी मुखर्जी, करीना कपूर, रवीना टंडन आणि ईशा देओल ह्याही महत्वाच्या भूमिकांमध्ये होत्या. अशा भव्य स्टारकास्ट असूनही हा चित्रपट डिझास्टर (पूर्ण अपयशी) ठरला. रिलीजनंतर चित्रपटाला नकारात्मक समीक्षणं मिळाली. विशेषतः चित्रपट लांबणे  हे त्याच्या अपयशाचं मुख्य कारण ठरवलं गेलं.

या चित्रपटाच्या अपयशामुळे पुरु राजकुमार, शहजाद खान, अमर उपाध्याय, बिक्रम सालूजा, विनीत शर्मा, करण नाथ, अरमान कोहली, दीपक जेठी, प्रिया गिल, आकांक्षा मल्होत्रा आणि अकबर नकवी यांसारख्या अनेक कलाकारांच्या करिअरला फटका बसला. काही जण अजूनही काम करत आहेत, पण त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. तरीसुद्धा आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो, तेव्हा अनेक प्रेक्षक तो आवडीने पाहतात.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : म्हातारी व्हायलीस लग्न कर, नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग, झरीन खानचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Case: मी जाळ्यात अडकले; तू अडकू नकोस ..33 वर्षीय त्विशा शर्माचा मृत्यूआधी मैत्रिणीला शेवटचा मेसेज; दुसऱ्याच दिवशी घडलं नको ते ..
मी जाळ्यात अडकले; तू अडकू नकोस ..33 वर्षीय त्विशा शर्माचा मृत्यूआधी मैत्रिणीला शेवटचा मेसेज; दुसऱ्याच दिवशी घडलं नको ते ..
'आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..
'आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..
Priya Bapat Bad Touch Experiance: '..तरी तो मला किस करतच राहिला..; प्रिया बापटला भोपाळमध्ये शुटिंग करताना आला वाईट अनुभव; म्हणाली ..
'..तरी तो मला किस करतच राहिला..; प्रिया बापटला भोपाळमध्ये शुटिंग करताना आला वाईट अनुभव; म्हणाली ..
Prajakta Mali Cannes Look VIDEO: यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक
यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक, परदेशी फोटोग्राफर्सच्याही नजरा खिळल्या...

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget