1994 चा ब्लॉकबस्टर सिनेमा, एका सीनवेळी सेटवर विचित्र घटना घडल्या, रवीनाने गायत्री मंत्र म्हटला अन्...
Bollywood : अभिनेता अनिल कपूर, श्रीदेवी आणि रवीना टंडन यांची प्रमुख भूमिका असलेला लाडला या सिनेमाच्या शूटींगवेळी विचित्र प्रकार घडला होता.

Bollywood : साल 1994 मध्ये लाडला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये रवीना टंडन आणि श्रीदेवी एकमेकांसमोर होत्या. या चित्रपटात अनिल कपूर नायकाच्या भूमिकेत होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक विचित्र योगायोग घडला, ज्याबद्दल स्वतः रवीना टंडनने एका मुलाखतीत सांगितले होते.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये जितक्या चित्रपटांची निर्मिती होते, तितक्याच कथा आणि किस्से देखील घडतात. कॅमेऱ्यासमोर स्टार्स कसे वागतात हे लोक पाहतात, पण प्रत्यक्षात त्यांच्यातील नातं वेगळंच असतं. काही कलाकार एकमेकांशी बोलतसुद्धा नाहीत, काहींमध्ये मतभेद असतात. असाच एक अंगावर काटा आणणारा अनुभव प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला होता.
ही गोष्ट आहे श्रीदेवी, रवीना टंडन आणि अनिल कपूर यांची. या तिघांनी मिळून लाडला या चित्रपटात काम केलं होतं. सुरुवातीला या चित्रपटात दिव्या भारती प्रमुख भूमिकेत होत्या. त्यांनी काही भागांचं शूटिंगसुद्धा पूर्ण केलं होतं. मात्र त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या जागी श्रीदेवीला घेण्याचा निर्णय घेतला.
दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर सगळी दृश्ये पुन्हा शूट करावी लागली. एका जुन्या मुलाखतीत रवीना टंडनने सांगितलं की दिव्या आणि शक्ति कपूर यांच्यातील एका सीनचं शूटिंग सुरू असताना दिव्या वारंवार गोंधळून जात होती. त्याच सीनसाठी अनेक टेक घ्यावे लागले होते.
दिव्याच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी लाडलाची शूटिंग पुन्हा सुरू झाली आणि श्रीदेवीला त्या भूमिकेसाठी घेतलं गेलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा तोच सीन श्रीदेवी करत होती, तेव्हा ती देखील त्याच डायलॉगवर अडखळत होती जिथे दिव्या भारती अडखळली होती.
हा प्रसंग आठवताना रवीना टंडन म्हणाली होती, “हे पाहून सगळ्यांच्या अंगावर शहारे आले.” टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या माहितीनुसार, रवीना म्हणाली की लाडलाच्या सेटवर सगळ्या टीमला एखाद्या अज्ञात व्यक्तीची उपस्थिती जाणवत होती. असं वाटत होतं की दिव्या भारती अजूनही तिथेच आहे.
चित्रपटाच्या सेटवर असं काहीतरी अघटित घडत होतं, जे कोणालाही स्पष्टपणे समजत नव्हतं. त्यामुळे सेटवरील सर्वांनी मिळून गायत्री मंत्राचा जप करायला सुरुवात केली. रवीना टंडन म्हणाली, “मी श्रीदेवीचा हात पकडला आणि प्रार्थना करायला सुरुवात केली.”
तिने सांगितलं की जेव्हा पुन्हा शूटिंग सुरू झालं, तेव्हा सेटवर नारळ फोडून वाईट शक्तींना दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर चित्रपट पूर्ण झाला आणि 25 मार्च 1994 रोजी प्रदर्शित झाला.
लाडला जेव्हा थिएटरमध्ये रिलीज झाला, तेव्हा तो ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटात श्रीदेवी एका श्रीमंत बिझनेसवुमनच्या भूमिकेत होती, रवीना तिच्या कंपनीत काम करणारी सामान्य स्त्री होती आणि अनिल कपूर एक प्रामाणिक व स्वाभिमानी व्यक्तिरेखा साकारत होते.
हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला आणि त्यामुळेच तो प्रचंड यशस्वी ठरला. अनेकांचं असंही म्हणणं होतं की, या चित्रपटाच्या यशामागे दिव्या भारतीची आभासित उपस्थिती आणि तिचं आशीर्वाद हेच कारण होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या























