एक्स्प्लोर

लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर किती दिवसांनी पार्टनरसोबत रिलेशन ठेवता येतं? बॉबी डार्लिंगने सांगितली माहिती VIDEO

Bobby Darling On Sex Change : लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर किती दिवसांनी शारीरीक संबंध ठेवता येतात? याबाबत ट्रान्स अभिनेत्री बॉबी डार्लिंगने माहिती सांगितली.

Bobby Darling On Sex Change : बॉबी डार्लिंग सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या आयुष्यातील संघर्षांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

बॉबी डार्लिंग यांनी सांगितले की, त्या जेव्हा दहावीत होत्या, तेव्हाच त्यांना आतून जाणवले की त्या प्रत्यक्षात एक मुलगी आहेत. यावेळी त्यांनी आपल्या लिंगपरीवर्तन (सेक्स चेंज) शस्त्रक्रियेबद्दलही सविस्तर बोलल्या आहेत. लिंगपरीवर्तन शस्त्रक्रियेनंतर जोडीदारासोबत शारीरिक संबंध किती दिवसांनी ठेवता येतात, याबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केलंय. 

लिंगपरीवर्तनानंतरचं आयुष्य

सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंग यांनी त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या की, 2015 मध्ये लग्न होण्यापूर्वीच त्यांनी लिंगपरीवर्तन केलं होतं.

सर्जरीनंतर काय होतं?

बॉबी डार्लिंग म्हणाल्या, “मी बँकॉकमध्ये माझं सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. या सर्जरीवर माझं सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले होते. मी जानेवारी महिन्यात ऑपरेशन ठरवलं होतं, तेव्हा त्यापूर्वीच्या सहा महिन्यांपासून मला हार्मोनल गोळ्या घ्याव्या लागत होत्या. दिवसातून तीन वेळा त्या गोळ्या घ्याव्या लागतात.”

सर्जरी किती वेळ चालली?

“मी रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. सर्जरी जवळपास 4 ते 5 तास चालली. ऑपरेशननंतर सतत चालत राहावं लागतं, झोपून राहणं परवानगीचं नसतं. यानंतर तुम्हाला लघवीची प्रक्रिया पार पाडावी लागते आणि मग पुढचा टप्पा सुरू होतो. नंतर डॉक्टर एक कृत्रिम अवयव (artificial organ) देतात, जो योनीमध्ये दररोज काही वेळासाठी घालावा लागतो, म्हणजे तिची योग्य रचना व खोली टिकून राहते. ही प्रक्रिया किमान सहा महिने दररोज एक तास करावी लागते. हे रॉड्स वेगवेगळ्या आकारात मिळतात – 6 इंच, 7 इंच, 8 इंच आणि जाडजूडही असतात. हे फायबरपासून बनवलेले असतात.”

पार्टनरसोबत संबंध किती दिवसांनी ठेवता येतात?

बॉबी डार्लिंग यांनी स्पष्ट केलं की, “ही डायलेशन प्रक्रिया सलग 6 महिने केल्यानंतरच तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवू शकता. तेव्हाच शरीर पूर्णतः तयार होतं आणि सर्व काही नैसर्गिक व सामान्य वाटतं. माझं ऑपरेशन मी बँकॉकमध्ये केलं होतं आणि तिथल्या बहुतांश सर्जरी यशस्वी ठरतात.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं, हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला! VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Cannes Look VIDEO: यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक
यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक, परदेशी फोटोग्राफर्सच्याही नजरा खिळल्या...
Netflix Crime Thriller: नेटफ्लिक्सवर येताच 1 तास 49 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकूळ;रिलीज होताच OTTवर कब्जा
नेटफ्लिक्सवर येताच 1 तास 49 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकूळ; रिलीज होताच OTTवर कब्जा
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'ची गर्जना बॉक्स ऑफिसवर दुमदुमली; जगभरातील एकूण कमाई 114 कोटींच्या पार
'राजा शिवाजी'ची गर्जना बॉक्स ऑफिसवर दुमदुमली; जगभरातील एकूण कमाई 114 कोटींच्या पार
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Embed widget