BMC Election 2026 Daisy Shah Shared Angry Video: सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची (Municipal Elections 2026) लगबग सुरू आहे. यंदा 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी (Mumbai Mahapalika Nivadnuk) एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर एकाच दिवशी सर्वच महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशातच, सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरू आहे. कुठे मोठमोठ्या रॅली, तर प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय. तर काही ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार घरोघरी जाऊन मतं मागून प्रचार करत आहेत.  मात्र काही वेळेस कार्यकर्त्यांना उत्साहाच्या भरात काही गोष्टींचे भान राहत नाही आणि मग अनर्थ घडतो. असाच काहीसा प्रकार मुंबईत (Mumbai Fire News) घडलाय. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे मोठा अनर्थ घडला. या प्रकाराविरोधात आता बॉलिवूड अभिनेत्रीनं (Bollywood Actress) संताप व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

अभिनेत्री डेझी शाहचा (Actress Daisy Shah) एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तिच्या तळपायाची आग, थेट मस्तकात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडीओमध्ये तिनं पाहिलंय की, तिच्या फ्लॅटच्या शेजारील इमारतीला फटाक्यांमुळे आग लागली. प्रचार रॅली सुरू असताना फटाके लावले आणि त्यामुळेच आग लागली, असंही अभिनेत्री डेझी शाहानं स्पष्ट केलंय.  

डेझी शाहची तळपायाची आग मस्तकात 

डेझी शाहने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती खूप रागात दिसतेय. अभिनेत्री डेझी शाह म्हणाली की, "हे इथे घडतंय. लोक निवडणुकीमुळे इथे आहेत. रस्त्यावर फटाके फोडले गेले आणि रस्त्यावर फटाके फोडल्यामुळे इमारतीला आग लागली. लोकांना समजत नाही... हे मूर्ख सरकारी लोक आहेत. ते प्रचार करण्यासाठी प्रत्येकाच्या इमारतीत जातायत... ते इमारतीच्या बाहेर फटाके फोडतात. मी या इमारतीच्या शेजारीच राहते आणि हे घडलंय. हे भयानक आहे... माझं घर जिथे आग लागली त्याच्या शेजारीच आहे..."

Continues below advertisement

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री डेझी शाहनं लिहिलंय की, "माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एखादी टीम नियुक्त करता, तेव्हा त्यांना थोडीशी अक्कल आहे, याची खात्री करा... घरोघरी प्रचार करण्यास परवानगी देण्यास नकार दिल्याबद्दल आमच्या बांधकाम समितीचे आभार... इमारतींजवळ फटाके फोडणं योग्य नाही. जेव्हा लोकांमध्ये नागरी जाणीव नसते, तेव्हाच असं घडतं. ही नैसर्गिक आपत्ती नाही. हे मूर्ख लोकांमुळे घडलंय. जबाबदारी घ्या... पुरे झालं आता..."

अभिनेत्री डेझी शाहनं आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, "जे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे..." व्हिडीओमध्ये तिनं स्पष्ट केलंय की, आता निवडणुकीची वेळ आहे. प्रचार सुरू आहे, हे समजण्यासारखं आहे. पण प्रचारादरम्यान फटाके फोडले पाहिजेत, असा कोणताही नियम नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nupur Savji Will Contest Nashik Municipal Election: सिनेसृष्टीतलं ग्लॅमर आता राजकीय आखाड्यात; मराठी अभिनेत्रीला भाजपकडून मनपा निवडणुकीचं तिकीट