Chandrika Dixit on producer: बिग बॉस फेम दिल्लीतील वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित (Chandrika Dixit) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे.  तिचे व्हिडीओ (Viral Video) आणि मुलाखती सोशल मीडियात व्हायरल होतात.  युमग गेरासोबत वाद ते मिस्ट्री मॅनसोबत अफेअरची चर्चा.  या कारणामुळे चंद्रिकाची भयंकर चर्चा होत आहे.  अलिकडेच तिनं एका मुलाखतीत, आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी, आपण स्वत: कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं तिनं म्हटलं होतं.  या कारणामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.  अलिकडेच चंद्रिकाने पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.  एका प्रॉड्युसरने कॉम्प्रोमाइजची डिमांड केली होती, असा धक्कादायक खुलासा तिनं केला.  यामुळे अनेकांना प्रचंड धक्का बसला.

Continues below advertisement

चंद्रिका दीक्षितने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत तिनं प्रॉड्यूसरबाबतीत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला. त्या व्यक्तीनं तिच्याकडे कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइजची मागणी केली.  एक रात्र घालवण्याची मागणी केली, असा धक्कादायक खुलासा चंद्रिकाने केला.   दरम्यान, चंद्रिकाने याचे पुरावेही सोशल मीडियात शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये चंद्रिका म्हणाली, 'आजकाल लोक खूप खालच्या पातळीचा विचार करतात. किती अज्ञानी झाले आहेत. आज मी या लोकांचे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे'.

 

Continues below advertisement

'जर तुम्हाला कोणत्याही मोठ्या इंडस्ट्रीत, जसं की फिल्मी दुनियेत पाऊल ठेवायचं असेल,  तुमचं अभिनेत्री होण्याचं मोठं स्वप्न असेल तर, ते पूर्ण करण्यासाठी  काही राक्षस तुमची वाट अडवतील. तसेच कॉम्प्रोमाइज करण्यास भाग पाडतील. मी या गोष्टींचा सामना केला आहे', असं चंद्रिका म्हणाली. याचा पुरावा चंद्रिकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.  या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती चंद्रिकाला, ' 'तुम्हाला प्रॉड्युसरसोबत कॉम्प्रोमाइज करावं लागेल', असं म्हणत आहे. 

'दोन लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तुम्ही किती पेमेंट घ्याल?', असा प्रश्नही चंद्रिकाला विचारण्यात येतो.   त्या व्यक्तीची मागणी ऐकून चंद्रिका संतापते.  चंद्रिकाने स्पष्ट केले की, अनेक मुलींना यातून जावे लागते.  स्वप्नांसाठी आत्मसन्मान पणाला लावावे लागते, असं चंद्रिका म्हणाली.