Bigg Boss OTT Fame Anurag Dobhal: बिग बॉस (Bigg boss) ओटीटी फेम प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल (Anurag dobhal) सध्या आपल्या वैयक्तिक कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. यूट्यूबरच्या आयुष्यात बरेच गोष्टी घडत आहे. त्याचा नुकताच इन्स्टाग्रामवर लाइव्ह (Instagram live) करत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या सर्व दु:खात त्याच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली आहे. अनुराग वडील झाला आहे. रामनवमीच्या विशेष दिवशी अनुरागची पत्नी रितिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानं ही गुडन्यूज सोशल मीडियात शेअर केली आहे. चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अनुराग वडील झाला (Anurag Dobhal news)
अनुरागची पत्नी रितिकाने आपल्या बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिनं ही गुडन्यूज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर बाळाच्या पायांचे फोटो शेअर केले आहेत. तिनं आपल्या पोस्टमध्ये बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. या जोडप्याला मुलगा झाला आहे की मुलगी हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, हे जोडपे सध्या बाळाच्या आगमनाने प्रचंड खूश झाले आहेत.
रितिकाने पोस्टमध्ये बाळाच्या पायांसह जन्मतारखेचा उल्लेख केला आहे. तिच्या बाळाचा जन्म 27 मार्च 2026 रोजी झाला. रितिकाने पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, देवाने आम्हाला आमची सर्वात अनमोल भेट दिली आहे'. सध्या रितिकाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रितिकाची पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच बाळावर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.
अनुराग अजूनही जखमेनं तडफडतोय
गेल्या काही काळापासून अनुराग डोभाल चर्चेत आहे. त्यानं यूट्यूब व्हिडीओद्वारे आपल्या फॅमिलीबाबत अनेक खुलासे केले होते. कुटुंबामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. अनुरागने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशनदरम्यान, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची भरधाव कार थेट एका डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. या भीषण अपघातात त्याच्या नितंबाच्या हाडांना दुखापत झाली असल्याची माहिती आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याला चालणे आणि फिरण्यास अडचण होत आहे.
या कठीण काळातही अनुरागला आनंद झाला आहे. त्याच्या घरी नवीन बाळाचे आगमन झाले आहे. वडील झाल्याचा त्याला खूप आनंद झाला आहे. त्यानं बाळासोबत काही फोटो क्लिक केले. दरम्यान, चाहत्यांना आशा की, वडील झाल्यानंतर अनुराग लवकर त्याच्या नैराश्यातून बाहेर पडेल.
