Akshay Kelakar Gift Dream Home to Wife: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी बायकोला खास भेट दिली आहे. ही लहान सहान भेटवस्तू नाही, तर त्याने मुंबईत स्वतःच्या हक्काचे दुसरे घर खरेदी करत त्याच्या पत्नीला ड्रीम होम गिफ्ट केलं आहे. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता झालेला अक्षय केळकरने 'अबीर गुलाल' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. करिअरच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने मायानगरीत हक्काचं दुसरं घर खरेदी केलं आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्याने आपल्या पत्नीला ड्रीम होम गिफ्ट केलं. गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत अभिनेत्याच्या पत्नीने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
अक्षयच्या पत्नीची भावनिक पोस्ट
अक्षय केळकर च्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. अक्षयच्या पत्नीने पोस्ट करत लिहिलं ' Dear Husband, मुंबईत स्वतःच घर घेणं हे कधीच सोपं नव्हतं, पण तू ते शक्य करून दाखवलंस ! आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तू मला माझं स्वप्न गिफ्ट केलंस. आणि काय हवं? तू माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्यास. मला इतक्या सुंदर आणि योग्य पद्धतीने लाडावल्याबद्दल तुझे खूप आभार. नवीन घर गिफ्ट केलंस ? तू खरच वेडा आहेस. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. कधी मी माझे सगळे निर्णय तुझ्यासोबत शेअर करू लागले आणि कधी तू मला लढायला हार न मानायला शिकवलं ते मलाच कळलं नाही. तू मला अधिक मजबूत आणि स्वावलंबी व्यक्ती बनवत आहेस. तुला आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ' असं साधना काकतकरने लिहिलं.
बायकोच्या पोस्टवर अभिनेता अक्षय केळकरनेही रिप्लाय दिलाय. तो म्हणाला ' तुझ्या सगळ्या आनंदाला डिजर्व्ह करतेस. तुझ्यावर स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं पाहणं ही माझ्यासाठी सर्वात सुंदर भावना आहे. हे फक्त आपल्या एकत्र पूर्ण होणाऱ्या अनेक स्वप्नांपैकी एकाची सुरुवात आहे. नेहमी आपल्या नात्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि प्रत्येक क्षण हाच बनवल्याबद्दल तुझं मनापासून आभार. मला तुझा कायम अभिमान वाटतो ' असं अक्षय म्हणाला.
