Bigg Boss Marathi Season 6: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन 11 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या शोच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. प्रत्येक नव्या पर्वासोबत प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता असते ती घरात जाणाऱ्या स्पर्धकांची. अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेत असलेल्या संभाव्य 17 स्पर्धकांवर एक नजर टाकूया.
गिरीजा ओक
मराठी-हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या विशेष चर्चेत आहे. निळ्या साडीतल्या तिच्या व्हायरल पॉडकास्टमुळे ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. तिची एन्ट्री झाली तर ती घरात वेगळीच छाप पाडू शकते अशी चर्चाय.
रसिका सुनील
याशिवाय, प्रत्येक सीझनमध्ये नाव चर्चेत येणारी अभिनेत्री रसिका सुनील यंदाही ‘बिग बॉस मराठी 6’साठी विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली आहे.
ईशा केसकर
‘जय मल्हार’मधील बानू म्हणून प्रसिद्ध झालेली ईशा केसकर देखील संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आहे. तिचा अभिनय आणि ड्रामॅटिक स्वभाव घरात रंगत वाढवू शकतो. नुकतीच ती लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडल्यामुळे चर्चेत होती.
आणखी कोणाची नावे चर्चेत?
ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांचं नावही चर्चेत आहे. त्यांच्या अनुभवामुळे घरात समतोल आणि परिपक्व खेळ पाहायला मिळू शकतो. विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे विजय पाटकर घरात आल्यास हलकाफुलका माहोल निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अभिनेता समीर परांजपे गंभीर आणि आक्रमक बाजू दाखवणारा ठरू शकतो. ‘हास्यजत्रा’मुळे लोकप्रिय झालेला गौरव मोरे आणि अभिनेता अंशुमन विचारे हेही चर्चेतले चेहरे आहेत.
गायक रोहित राऊत, सोशल मीडिया स्टार डॅनी पंडित, रिलस्टार अनुश्री माने आणि अर्थव रुके यांची नावं तरुण प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेत आहेत.याशिवाय, नृत्यांगना गौतमी पाटील घरात आली तर टीआरपी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ‘बिग बॉस हिंदी’मध्ये झळकलेले गुणरत्न सदावर्ते मराठी सीझनमध्येही दिसू शकतात, अशी चर्चा आहे. हॉटेल व्यवसायाशी संबंधित नागेश मडके, रवी काळे आणि लक्ष्मण भोसले यांची नावंही सोशल मीडियावर फिरत आहेत. एकूणच, ‘बिग बॉस मराठी 6’बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, यापैकी कोणते चेहरे खरोखर घरात जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!
बिग बॉस मराठी सिझन 6ची सुरुवात 11जानेवारी 2026 पासून होणार आहे. हा धमाकेदार रिअॅलिटी शो प्रेक्षकांना दररोज नव्या ट्विस्ट्स, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा फुल डोस देणार आहे. हा बहुचर्चित शो दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय, डिजिटल प्रेक्षकांसाठी JioHotstarवरही बिग बॉस मराठी सिझन 6 पाहता येणार आहे.