Bigg Boss Marathi Season 6 Grand Finale: 17 स्पर्धकांसोबत सुरू झालेला बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) सहाव्या सिझनचा प्रवास आता संपण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांत बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.  टॉप 5 स्पर्धकांमधून एका स्पर्धकाला बिग बॉसची ट्रॉफी मिळणार आहे.  फायनलिस्टमध्ये विशाल कोटियन,  दिपाली सय्यद, अनुश्री माने, राकेश बापट आणि तन्वी कोलते या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे (Entertainment).  बिग बॉसच्या घरातील प्रवास खरंतर खूप मोठा (Bigg Boss Marathi Prize Money) आहे.  जबरदस्त टास्क आणि गेम खेळून या स्पर्धकांनी इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे. आता या टॉप 5 स्पर्धकांमधून कुणाचं नाव बिग बॉसच्या ट्ऱॉफीवर असणार, कोण ट्रॉफी पटकावणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आणि चाहते आतुर आहेत.  विशेष म्हणजे विजेत्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 15 लाख रुपायांचा धनादेशही मिळणार आहे. 

बिग बॉस विनरला किती लाखांचं मिळणार धनादेश? (Bigg Boss Marathi Prize Money 15 Lakhs)

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा बहुप्रतिक्षित महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. अनेक  आठवड्यांच्या तीव्र नाट्य, टास्क आणि मनोरंजनानंतर,  निर्मात्यांनी अधिकृतपणे माहिती दिली की,  या शोचा अंतिम भाग रविवारी 19 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे.   दरम्यान, या पर्वाचा एक रोमांचक समारोपासह शेवट होईल.  बिग बॉसचा महाअंतिम सोहळा कलर्स मराठी या वाहिनीवर  रात्री  8 वाजचा  प्रसारित होणार आहे. बिग बॉस या शोचा महाअंतिम सोहळा डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपल्याला पाहता येईल. जिओ हॉटस्टारवर आपल्याला महाअंतिम सोहळा पाहता येईल.  

व्होटिंग लाईन्स किती तारखेपर्यंत सुरू? (Bigg Boss Marathi prize money 15 lakh)

 

व्होटिंग लाईन्स सध्या ओपन आहेत. आपण आपल्या आवडत्या स्पर्धकाला व्होट करु शकता. भरभरुन व्होट देऊन आपण आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता करू शकता. आपल्या आवडत्या फायनलिस्ट स्पर्धकाला विजेता करण्यासाठी अजूनही वेळ आहे. आपण व्होट शनिवार (18 एप्रिल) दुपारी 3 वाजेपर्यंत व्होट करु शकता. नंतर व्होटिंग लाईन्स बंद होतील.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनच्या विजेत्याला ट्रॉफीसह रोख रक्कमही मिळणार आहे.  माहितीनुसार, बिग बॉस विनरला 15 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.  वाईल्डकार्ड स्पर्धक राखी सावंतच्या एलिमिनेशननंतर  या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे.  बाहेर पडताना, तीन दरवाजांपैकी एक निवडायला सांगितले गेले. प्रत्येक दरवाज्यावर वेगवेगळी रक्कम होती.  एका दरवाज्यावर 10 हजार, दुसऱ्यावर 10 लाख आणि तिसऱ्या दरवाज्यावर 7 लाख रुपये होते.  तिने 7 लाख रुपये असलेला दरवाजा निवडला. परिणामी ही रक्कम थेट आधीपासून असलेल्या बक्षीस निधीमध्ये जोडली गेली. यामुळे बक्षीस रक्कम 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचली.  दरम्यान, ही बक्षीस रक्कम  कुणाला मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.