Major Controversy in Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी स्पर्धकांमुळे तर, कधी टास्कमुळे या शोची प्रचंड चर्चा होते. या शोमधून आतापर्यंत 2 स्पर्धकांना एलिमिनेट करण्यात आले आहे. मात्र, अलिकडेच एका स्पर्धकाला एलिमिनेट न करता घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिची घरातून हकालपट्टी केली आहे. दिव्याने भरकार्यक्रमात जीवे ठार मारण्याचे विधान केले होते. तिच्या विधानामुळे घरातील वातावरण प्रचंड तापलं. दंड म्हणून दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून थेट हकालपट्टी करण्यात आली.
बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलंय?
बिग बॉसच्या घरातील टास्क हे कायम चर्चेत असतात. अलिकडेच स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये घरात राहण्यास अपात्र वाटणाऱ्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर लाल रंगाच्या पेंटने फुली मारायची होती. त्यानुसार, स्पर्धकांनी नावं घेतली. तन्वीनं दिव्याचं नाव घेतलं. तन्वीनं दिव्या घरात राहण्यास अपात्र असल्याचं सांगितलं. यानंतर दिव्या संतापली असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दिव्याने घरातील काही स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची थेट धमकी दिली. यामुळे घरातील वातावरण तापलं.
दिव्या बिग बॉसच्या घरात म्हणाली, "माझ्या कानावर आलं की मी बाहेरच्या गोष्टी घरात बोलते. पण मी काही वेगळं बोललेली नाही. बिग बॉसच्या घराबाहेर माझ्या हातात कायम तलवार असते. ती तलवार आता माझ्या घरी आहे. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की ती तलवार मी घराबाहेर गेल्यानंतर चालवणार नाही. या घरात जे कुणी माझ्याबाबतीत बोलत आहेत, त्यांच्यावर ती तलवार चालवणार", असं म्हणत दिव्यानं घरातील काही सदस्यांना थेट धमकी वजा इशारा दिला.
दिव्याने दिलेल्या धमकीनंतर घरात एकच गदारोळ झाला. बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच दिव्या चांगल्याच शब्दांत झापलं. नंतर दिव्या राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली. परंतु, घरातील सदस्यांची तिनं माफी मागण्यास नकार दिला. याच कारणास्तव दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली.