Bigg Boss Marathi 6: रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘भाऊ’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यांच्या दमदार होस्टिंगने यंदाचा सिझन अधिकच खास ठरणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे बिग बॉस मराठी सिझन 6ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय…” या रितेश भाऊंच्या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Bigg Boss Marathi Season 6)
नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊंचा मस्त लूक, आत्मविश्वासाने ओसंडून वाहणारा स्वॅग आणि ठसकेबाज डायलॉग्स प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या वाक्याने चाहत्यांची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं, आणि यंदा तोच स्वॅग, पण रितेश भाऊंच्या खास पॅटर्नमध्ये पाहायला मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
कधी सुरू होणार बिग बॉस मराठी सिझन 6?
बिग बॉस मराठी सिझन 6ची सुरुवात 11जानेवारी 2026 पासून होणार आहे. हा धमाकेदार रिअॅलिटी शो प्रेक्षकांना दररोज नव्या ट्विस्ट्स, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा फुल डोस देणार आहे. हा बहुचर्चित शो दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय, डिजिटल प्रेक्षकांसाठी JioHotstarवरही बिग बॉस मराठी सिझन 6 पाहता येणार आहे.
यंदाचा सिझन का खास?
मागील सिझनने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि यंदा त्याहून मोठ्या स्तरावर शो सादर केला जाणार असल्याचं दिसतं. बिग बॉस मराठी सिझन 6 चा प्रोमो लार्जर-दॅन-लाईफ असल्याचं स्पष्ट दिसतं. भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीसारखं वातावरण, ढोल-ताशांचा दणदणीत गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 250 ते 300 लोकांची उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने हा प्रोमो शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रितेश भाऊ पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत.
प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा आत्मविश्वास, देसी अॅटिट्यूड आणि स्टाईल प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या प्रोमोमुळे अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. यंदाचा पॅटर्न नेमका काय असणार? घरात कोणते चेहरे दिसणार? कोणाचा नवस पूर्ण होणार आणि कुणाच्या सलामीने घराचं वातावरण झिंगणार? “काही असेही असणार… पण मी गप्प नाही बसणार!” या कडक डायलॉगमुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.