Janhavi Killekar on Missing Child: सध्या 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम आणि मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) कायम चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रीय असते. अलिकडेच अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करुन हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आवाहन केलं आहे. 14 वर्षीय मुलगा पुण्यातील हडपसर येथील शाळेतून बेपत्ता आहे. 9 सप्टेंबर 2026 पासून हा विद्यार्थी (Student) बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुलगा अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान, आता अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने व्हिडीओ शेअर करुन विद्यार्थी मुलाला शोधण्यासाठी आवाहन केलं आहे.  या व्हिडीओद्वारे जान्हवी किल्लेकरने, हरवलेला मुलगा (Missing Child) कुठेही दिसल्यास तातडीने संपर्क साधावा, असे नेटकऱ्यांना आवाहन केले आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?  (Janhavi Killekar Appeals To Find Punes Missing Boy)

हे प्रकरण पुण्यातील हडपसर परिसरातील असल्याची माहिती आहे. अनमोल विश्वकर्मा (वय वर्ष 14) असे मुलाचे नाव आहे.  हा विद्यार्थी 'सिग्नेट पब्लिक स्कूल'मध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हा तरुण शाळेतून घरी गेलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार,  अनमोलला शाळेत परिक्षेच्या दरम्यान कॉपी करताना पकडलं. कॉपी करत असल्याचं आढळताच,  शिक्षकांनी त्याला ओरडले. तसेच याची माहिती पालकांना देणार असल्याचं सांगितलं. अनमोल घाबरला.  त्याने शाळेतून थेट घर नाही गाठले. पालकांना कळालं तर, ते ओरडतील या भीतीने  अनमोल घरीच गेला नाही.    घाबरून अनमोल घरीच गेला नाही. 

9 सप्टेंबरपासून अनमोल घरी आला नाही, या कारणामुळे अनमोलच्या घरच्यांना चिंता वाटू लागली.  अनमोलच्या कुटुंबाने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली.  अनमोलचे मित्र तसेच परिसरात आणि नातेवाईकांकडेही त्याची विचारपूस केली. पण तो काही सापडला नाही.  अनमोल बेपत्ता होऊन 1 महिना उलटला आहे. त्याचे आई वडील चिंतेत आहेत. अलिकडेच जान्हवी किल्लेकरने अनमोलचा शोध घेण्यासाठी व्हिडीओतून आवाहन केलं आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जान्हवी किल्लेकर व्हिडीओत म्हणाली की, 'नमस्कार मी जान्हवी किल्लेकर.  14 वर्षांचा अनमोल मोतीलाल विश्वकर्मा, हा मुलगा 9 सप्टेंबर 2026 पासून बेपत्ता आहे. सिग्नेट पब्लिक स्कूल, हांडेवाीडी रोड हडपसर, पुणे येथून बेपत्ता झाला असल्याची माहिती आहे.  मी सगळ्यांना एक विनंती करेन, जर तुम्ही या मुलाला पाहिलं असेल तर,  कुठे दिसला असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.  जर नंबर नाही सापडला तर, पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती द्या '.

'कुठेही दिसल्यास याची माहिती द्या. कारण अनमोल खूप दिवस झाले बेपत्ता आहे. त्याच्या आई - वडिलांना नक्कीच मानसिक त्रास झाला असेल. कारण आपलं बाळ हरवलं, तर कसा त्रास होतो, हे केवळ आई  - वडीलच समजू शकतात.   मी सर्वांना विनंती करते, हा मुलगा कुठेही दिसल्यास संपर्क साधा', असं तिने व्हिडीओत म्हटलं आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, 'अनमोल मोतीलाल विश्वकर्मा हा 14 वर्षीय मुलगा 9 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. सिग्नेट पब्लिक स्कूल, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे येथून बेपत्ता झाला आहे.  कृपया आम्हाला विनंती करा.  संपर्क - 7028288086.'.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर