Bigg Boss Marathi Smoking and Drinking Rules: रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या रिअॅलिटी शोमधील कलाकार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. भांडणं असो किंवा मिळून मिसळून खेळ खेळणे, प्रत्येक कलाकाराचा हटके अंदाज आणि टास्क पूर्ण करण्याची शैली प्रेक्षकांना आवडत आहे. विकेंडला भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय? याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. घरातील स्पर्धकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अलिकडेच सागर कारंडेचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर येताच, बिग बॉसच्या घरात व्यसन करण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
केवळ तंबाखू नसून, बिग बॉसच्या घरात स्पर्धकांकडून इतरही व्यसन केले जातात का? स्मोकिंग आणि ड्रिंकिंगला देखील परवानगी आहे का? असा सवालही सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. या प्रश्नावर बिग बॉस मराठीचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी उत्तर दिलं आहे. एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केतन म्हणाले, "सागरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सागर तंबाखू खात असल्याचं म्हटलं जात आहे. पण तुम्ही नीट व्हिडिओ पाहिलात तर, तुम्हाला कळेल की, तो अभिनेता निळू फुले यांची अॅक्टिंग करत आहे".
"सागर तिथे तंबाखू खात नव्हता. सागर या व्हिडिओमध्ये पाठ करून उभा आहे. तिथे राधा देखील होती, राधाचं चाललं होतं की, बाईईईई, आम्हाला तुमचा शो करायचं असं वगैरे, त्यांचा हास्यविनोद सुरू होता. सागर काही तंबाखू खात नव्हता. आपण नॅशनल टिव्हीवर असं काही दाखवू शकत नाही, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे", असं मुलाखतीत केतननं स्पष्ट केलं.
दरम्यान, सागरचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल होताच घरात स्मोकिंग आणि ड्रिंक केली जाते का? बिग बॉसच्या घरात व्यसन करण्यास परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांचे उत्तर देताना केतन म्हणाला, "बिग बॉसच्या फॉरमॅटमध्ये स्मोकिंग झोन आहे. स्पर्धक स्मोकिंग झोनमध्ये जाऊन सिगारेट ओढू शकतात. परंतु, ते कुठेही इतर ठिकाणी स्मोक करू शकत नाहीत. तसेच आपण ते दाखवूही शकत नाही. ड्रिंकला बिग बॉसच्या घरात परवानगी नाही", असं केतनने मुलाखतीत स्पष्ट केलं.