Vishal Kotian Nominated for Entire Season: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi) आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बऱ्याच गोष्टींमुळे बिग बॉसचं घर चर्चेत राहिलं. नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल आणि राकेशमध्ये राडा झाला. भांडणामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं होतं. यानंतर राकेशच्या (Rakesh Bapat) कुटुंबाने प्रसिद्धी पत्रक जारी करत, विशालवर अॅक्शन घेण्याची विनंती केली. कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनीही विशालवर टीका केली. आता बिग बॉसने विशालला (Vishal Kotian) शिक्षा दिली आहे. विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट (Nomination) करण्यात आलं आहे. याचा प्रोमो कलर्स मराठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक विशाल कोटियन ढसाढसा रडताना दिसत आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
विशाल कोटियनला पश्चाताप, बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला (Bigg Boss Marathi Vishal Kotian)
बिग बॉसच्या घरात अलिकडेच तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये तन्वी कोलतेनं बाजी मारली. सहाव्या सिझनची पहिली फायनलिस्ट अभिनेत्री तन्वी कोलते ठरली. तिचं विशेष कौतुक केलं जात आहे. एकीकडे तन्वी कोलते ट्रॉफी जिंकण्याच्या प्रवासात एक पाऊल पुढे आहे तर, दुसरीकडे विशाल कोटियनने सर्व काही गमावलं आहे. एका चुकीमुळे विशालला ही शिक्षा भोगावी लागत आहे. राकेशसोबत झालेल्या राड्यानंतर विशालला बिग बॉसने शिक्षा सुनावली आहे. विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. यामुळे त्याला प्रचंड पश्चाताप होतोय.
विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे (Vishal Kotian And Rakesh Bapat)
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विशाल हा एकटाच पूल जवळ बसलेला दिसतो आहे. तो ढसाढसा रडत म्हणतो, 'बिग बॉसच्या घरात मी 12 आठवडे अगदी जीव तोडून खेळलो. फक्त एका चुकीमुळे मी सगळं काही घालवलं, गमावलं. या घरात मी काहीच करु शकत नाही. मला माझ्या बाबांसाठी खेळायचं आहे. आईसाठी जिंकायचं आहे. पण आता कसे, ते मला कळत नाही', असं विशाल म्हणतो. बिग बॉसच्या घरात झालेल्या राड्यानंतर राकेशला एका आठवड्यासाठी तर, विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलंय.
भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुख विशालवर भडकला होता. त्यानं विशालला कडक शब्दांत सुनावलं होतं. 'विशाल तुम्ही राकेश यांना नाही तर, जिंकण्याच्या ट्रॉफीला धक्का मारला आहे. महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नाही. हे खपवून घेतलं जाणार नाही', असं रितेश विशालला म्हणतो. प्रेक्षक तसेच नेटकऱ्यांनीही विशालच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. आता प्रेक्षकांचे लक्ष ग्रँड फिनालेकडे आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
