Vishal and Ruchita breakup promo: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या घरातून आतापर्यंत तगड्या स्पर्धकांची एक्झिट झाली.  आता तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. यामुळे बिग बॉसच्या घरात अगदी टफ फाईट पाहायला मिळत आहे. रेवा कौरासे या अभिनेत्रीनं घरात एन्ट्री घेताच, आपला दरारा दाखवण्यास सुरुवात केली.  बिग बॉसच्या घरात विशाल कोटियन आणि रुचिता जामदार  यांच्यात प्रेम बहरलं होतं.  रुचिताने आपल्या मनात विशालबद्दल भावना असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, रेवाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच, रुचिता आणि विशालच्या नात्यात दरी आल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांचा लवकरच ब्रेकअप होणार असल्याचं बोललं जात आहे.  सध्या  याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

रुचिता आणि विशाल सुरुवातीपासून एका गटात होते. दोघांमध्ये मैत्री आहे.  दरम्यान, या गटात आता फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे. दोघांचा  बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो समोर आला आहे. विशालनं रुचिताला, 'मी तुझ्याशी बोललो ही सर्वात मोठी चूक होती..' असं म्हटलं आहे. यानंतर रुचिताला सागर आणि राखी मिळून समजवण्याचा प्रयत्न करतात. रुचिता शांत उभी असते. तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. 

कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विशाल आणि रुचिता एकमेकांच्या बाजूला बसले असल्याचं दिसत आहे. रुचिता विशालला, 'तू मला आवडतो तर आवडतो..', असं म्हणते.   त्यावर विशाल, 'तुला असं वाटतंय का की मी तुझ्या मागे मागे यावं', असं रुचिताला म्हणतो.   विशालच्या म्हणण्यावर रुचिता, 'तुला कळतंय का? ती माझी रिअॅक्शन होती',  असं म्हणते. यानंतर विशाल हात जोडतो, तसेच रुचिताला 'मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोललो ही सर्वात मोठी चूक आहे', असं म्हणतो.  यानंतर रुचिता जागेवरुन उठते  आणि निघून जाते.  तिला राखी आणि सागर समजवतात.   

Continues below advertisement

 

राखी समजवत असताना रुचिताला चक्कर येते. ती थेट खाली पडते. त्यानंतर राखी जोरात ओरडते. तसेच विशालला, रुचिता खाली पडली असं सांगते. कलर्स मराठीनं याचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत त्यांनी, 'विशाल आणि रुचिताचं ब्रेकअप होणार का?' असं कॅप्शन दिलं आहे. विशाल याआधी, रेवाला मी पटवणार, असं रुचितासमोर म्हणाला होता. यानंतर रुचिता नाराज झाली होती. रेवा कौरासेमुळे दोघांच्या नात्यात दरी येणार का? खेळात पुढे नेमकं काय होणार? हे लवकर समोर येईल.