Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात समीकरणं क्षणाक्षणाला बदलत असतात, पण आता घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर आणि तन्वी यांच्यात किचनमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेलं हे भांडण आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. घरातील समीकरणं सतत बदलत असली तरी आता वाद-विवादांनी वातावरण अधिकच तापल्याचं चित्र आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये घरातील किचन एरियामध्ये सागर आणि तन्वी यांच्यात जोरदार वाद रंगताना पाहायला मिळतो.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

किचनमध्ये कामाच्या गडबडीत असताना सागर आणि तन्वी यांच्यात शब्दाला शब्द वाढला. तन्वीने सागरच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला, तर सागरनेही तिला जशास तसे उत्तर दिले. या वादात घरातील इतर सदस्य मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, पण दोघांचाही राग अनावर झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. आता या वादाचे पडसाद येणाऱ्या भागात कसे उमटतात आणि 'बिग बॉस' यावर काय भूमिका घेतात, हे बघूया. पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी सिझन 6’, आज रात्र 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

वादाचे काही तिखट संवाद:

तन्वी : " मला का बोलतो आहेस सारखा सारखा ?"सागर : "तू मला बोलते आहेस !"तन्वी : तू माझ्याशी आरेरावीनेच बोलतो आहेस सागर दादा सागर : मी अजिबात आरेरावी केलेली नाहीये .तन्वी : तू टीमचा राग काढतो आहेस, माणुसकीला तरी जप... माझ्याशी असं नाही बोलायचे सागर : दरवेळेसची नाटकं आहेत यार... 

Continues below advertisement

 

या वादाचा परिणाम पुढील खेळावर आणि घरातील नातेसंबंधांवर काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस’ यावर नेमकी काय भूमिका घेतात आणि या भांडणानंतर सागर व तन्वी यांच्यातील नातं आणखी बिघडतं की सुधारतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.