Ruchita Jamdar: बिग बॉसचा सहावा सिझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात  रुचिता जामदार (Ruchita Jamdar) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. तिच्या अचानक झालेल्या eviction मुळे घरातील सदस्यांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. घराबाहेर पडल्यानंतरही रुचिता प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात 8 आठवडे राहून आल्यानंतर तिने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. अनेक स्पर्धकांची पोलखोल करताना ती दिसतेय. नुकताच तिने एक Video शेअर केलाय. यात ती म्हणालीय, तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या खूप जवळ येऊन बोलायची. मला तो वास सहन होत नाही, म्हणून ती मुद्दाम करायची कदाचित..असं रुचिता म्हणताना दिसतेय. अनेकांना तिच्या या खुलाशानंतर शॉक बसल्याचं दिसतंय. (Bigg Boss Marathi 6)

Continues below advertisement

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचीताने अनेक स्पर्धकांची भांडाफोड केलीय. तन्वीला बोलताना अनेकदा रुचीताची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं होतं. तिला अनेकवेळा रितेश भाऊंनी सुनावलंही होतं. आता घराबाहेर पडल्यानंतर तिने आपली भूमिका मांडलीय.

तन्वी स्मोक करून बोलायला यायची...

बिग बॉसच्या घरात रुचिता तन्वीला ' म्हणताना दिसली. त्यावर रुचिता म्हणाली," तो तर मुद्दाच खूप वेगळा होता. तन्वीने एक नवीन गेम काढला होता. प्रत्येक भांडणात ती माझ्या क्लोज यायची. कारण तन्वीला माहित होतं रुचिताचा पर्सनल स्पेसमध्ये गेल्यानंतर ती ॲग्रेसिव्ह होईल. तिला उचकवल्यावर रुचिता भडकेल. हात उचलेल आणि घराच्या बाहेर जाईल आणि तिला तेच हवं होतं. कारण किती जरी म्हटलं तरी तन्वीची आणि माझी पर्सनॅलिटी सेम होती. जर मी गेले असते तर तिचा फिनाले कडचा प्रवास सुरळीत झाला असता. त्यामुळे ती भडकवायचा प्रयत्न करायची. 

Continues below advertisement

रुचिता पुढे म्हणाली ' घरातील सगळ्यांना माहित होतं मला स्मोकचा त्रास होतो . मला स्मोकचा स्मेल सहन होत नाही. तन्वी स्मोक करून यायची, आणि माझ्याजवळ येऊन बोलायची. तितक्या जवळ यायची आणि तिला वाटायचं मी हात उचलावा. स्मोकच्या वासामुळे मी तिला खरकटी म्हणाले होते. मी खूप शब्दशः असं म्हणाले होते. त्याचा दुसरा अर्थ काढला गेला. मी भाऊच्या धक्क्यावर असंही बोलले होते की मी वेगळ्या अर्थाने बोलले नव्हते. स्मोकचा स्मेल येत होता, त्याच्यावरून मी बोलले होते. पण ते एपिसोडमध्ये दाखवलेलंच नाही. त्यांचं टाईम लिमिट आहे की काय मला माहित नाही" असं म्हणत रुचिताने स्पष्टीकरण दिलं. तिच्या या खुलाशामुळे बिग बॉसच्या घरात जिथे स्पर्धकांना बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवलं जातं, तिथे नशेचे पदार्थ कसे पुरवले जातात? अशी चर्चा रंगली आहे.