Bigg Boss Marathi 6 latest elimination news today: बिग बॉसच्या मराठीच्या सहाव्या सिझनची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. सहा आठवड्यात आतापर्यंत तगड्या कलाकारांना नारळ देण्यात आलं. दरम्यान, सातव्या आठवड्यात कोणता स्पर्धक एलिमिनेट होणार? याची प्रचंड चर्चा रंगली होती. सातव्या आठवड्यात कोणता सेलिब्रिटी घराबाहेर जाणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यात सचिन कुमावत एलिमिनेट झाला होता. सातव्या आठवड्यात एकूण ४ जणांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. यापैकी  रोशन भजनकरला एलिमिनेट करण्यात आले आहे. सध्या रोशन भजनकरचा एलिमिनेशनचा प्रोमो  सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  रोशन भजनकरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Continues below advertisement

बिग बॉसच्या सातव्या आठवड्यात ४ जणांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते.  राकेश बापट, राखी सावंत, रोशन भजनकर आणि प्राजक्ता शुक्रे या 4 स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले होते. तन्वी कोलते कॅप्टन असल्याकारणाने ती नॉमिनेशन टास्कदरम्यान सुरक्षित असते.  तर, प्रभू आणि अनुश्री यांच्याकडे पॉवर की असतात, त्यामुळे त्यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार नसते. इतर 4 स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले. त्यापैकी रोशन भजनकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास या आठवड्यात संपला.  दरम्यान, नेटकऱ्यांनी रोशनच्या एलिमिनेशनवर नाराजी व्यक्त केली. 

कलर्स मराठीनं बिग बॉस मराठीचा  नवा प्रोमो सोशल मीडियात शेअर केला आहे.  यामध्ये रितेश देशमुख स्पर्धकांना धक्का देतो. एलिमिनेशन उद्या नसून आज होणार असल्याचं रितेश सांगतो. रितेश एलिमिनेशनसाठी  नॉमिनेट असलेल्या स्पर्धकांना एक-एक नाव सांगा, असं म्हणतो. त्यावर प्राजक्ता  रोशनचं नाव, राखी रोशनचं नाव, राकेश प्राजक्ताचं आणि रोशन स्वत:चं नाव घेतो. शनिवारीच रोशन भजनकर बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो. त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवासाचा व्हिडिओ कलर्स मराठीने  व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी प्राजक्ता भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं.

Continues below advertisement

 

बिग  बॉसच्या घरात आता लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री रेवा कौरसेचं नाव सध्या चर्चेत आहे. तर,  ईटाइम्सने अभिनेता संकेत पाठक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचे विशेष वृत्त दिले आहे. तसेच  इन्फ्लुएंसर संस्कृती साळुंखे बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.