Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी घडतायत. स्पर्धकांचे वाद विवाद तर सुरु आहेतच पण घरातल्यांचा खेळ बघून चाहतेही स्पर्धकांना ट्रोल करताना दिसतायत. आठवड्याभराच्या खेळानंतर बिग बॉसच्या घरात आज भाऊचा धक्का आहे. अर्थात रितेश भाऊ यावेळी अनेक स्पर्धकांची शाळा घेणार आहे. कलर्स मराठीने एक प्रोमोही शेअर केलाय. यात रितेश भाऊ तन्वी कोलतेची शाळा घेताना दिसतायत. तन्वी उगाच मुद्दा खेचते. तुम्ही रिस्पाँड नाही रिॲक्ट होता. राखीने तन्वीला विचारलेलं की आयुष तुझा बॉयफ्रेंड आहे का? त्यावर ट्रिगर होऊन घरात इतका आरडाओरडा केला की प्रेक्षकांच्या कानाचा पडदा फाटला. असं रितेश भाऊ तन्वीला म्हणताना दिसतायत. दरम्यान, शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी मोठी घोषणा केली. घरातल्या स्पर्धकांना रविवारच्या धक्क्यावर मिळणारा एलिमिनेशनचा नारळ आता शनिवारी म्हणजे आजच मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धकांचं धाबं दणाणलंय.
नेमकं काय होणार बिगबॉसच्या घरात?
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ एलिमिनेशन उद्या नाही आज आणि आत्ता होणार असल्याचं रितेश भाऊ सांगतात. या घोषणेनंतर सगळेच स्पर्धक हादरले होते. त्यानंतर आज होणाऱ्या एलिमिनेशसाठी स्पर्धकांना एका स्पर्धकाला त्यांचं मत व्यक्त करायचं होतं. यात प्राजक्ता शुक्रेने रोशन एलिमिनेट होईल असं म्हटलं. तर राकेशला प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट होईल असं वाटतंय. राखीलाही रोशन घराबाहेर जाईल असं वाटलं. आणि खुद्द रोशलाही तो स्वत:च एलिमेनेट होईल अशी शंका वर्तवली. त्यानंतर रितेश भाऊंनी एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव घोषित केलं. पण प्राेमोमध्ये त्या स्पर्धकाचं नाव दाखवण्यात आलं नाही.
हा प्रोमो पाहूनप्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्येत्यांचे अंदाज वर्तवलेआहेत.अनेकांनी प्राजक्ता किंवारोशनपैकीकोणीतरीजाऊशकते असा अंदाज प्रेक्षकांनीवर्तवलाय.
गेल्या काही दिवसांपासून अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड होणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चा सुरु असतानाच, पुढील आठवड्यात बिग बॉसच्या घरात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नव्या सदस्याची वाईल्ड कार्ड होणार आहे. प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळाली. सहा आठवड्यात बरेच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले.
