Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 च्या घरात रविवारच्या भागात तीन वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या. ही स्पर्धक घरात आता तुफान राडा घालताना दिसणार आहे. मनोरंजन विश्वातील ओळखीचे चेहरे आता बिग बॉसच्या घरात आले आहेत. त्यामुळे यंदा मनोरंजनाचा Triple धमाका पाहायला मिळणार आहे. रेवा कौरासे,संस्कृती साळुंके आणि संकेत पाठकने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. पण घरात येताच दोन स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाल्याचा एक प्रोमो समोर आला आहे. रेवा कौरासेने घरात एन्ट्री घेताच बिग बॉसच्या घरातील वातावरण तापले आहे. घरात आल्या आल्या रुचिता आणि रेवा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. रेवा कौरासे ही प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे. संस्कृती साळुंके लोकप्रिय रिॲलिटी शो स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डान्सर आणि मॉडेल आहे.

Continues below advertisement

नेमके काय घडले ?

बिग बॉसच्या घरात एक नाही तर तीन-तीन स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यामुळे आधीपासून असलेल्या स्पर्धकांना चांगलाच धक्का बसल्याचा दिसलं . घरात एन्ट्री घेताच नव्या स्पर्धकांनी आपला गेम सुरू केल्याचा दिसलं. रेवा आणि रुचिता दोघी भांडताना दिसल्या. रेवा म्हणते, "असं झालंय की रुचिताला आवाज ऐकायचा नाहीय". यावर रुचिता, "पण मी तुला विचारलंच नाही आहे, आली मोठी शहाणी" म्हणताना दिसते. रेवाने रुचिताला तिच्या दिसण्यावरूनही आणि ड्रेसिंगवरूनही टोमणा मारल्याचं दिसलं. ती म्हणते, "हे सगळं करून छान दिसतेस". 

 

Continues below advertisement

यावर रुचिताही खवळते, "मी छान दिसते, वाईट दिसते मला त्याच्यासाठी काही देणंघेणं नाही" "तुला मी सांगतच नाहीये", असं म्हणत रेवा रुचिताचा हात धरायला जाते. तेव्हा रुचिता तिला म्हणते डोंट टच मी डोंट टच मी गेट लॉस्ट म्हणते. 

रुचिताशी बोलणं म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखं

वाइल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश करताच नव्या स्पर्धकांना काही ठोस भूमिका जाहीर करण्याचं टास्क देण्यात आलेलं. त्यांना घरातील टॉप आणि फ्लॉप सदस्य ठरवण्याबरोबरच कोणाला दुर्लक्षित करणार आणि कोणाला टार्गेट करणार, हे स्पष्ट सांगावं लागलं. या वेळी रेवाने विशालला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला, तर रुचिताला इग्नोर करणार असल्याचं सांगितलं.

रुचिताचा खेळ आणि तिची बोलण्याची पद्धत आपल्याला पटत नाही; तिच्याशी बोलणं म्हणजे स्वतःच संकट ओढवून घेण्यासारखं आहे, असं मत रेवाने व्यक्त केलं होतं. मात्र घरात पाऊल टाकताच तिने पहिल्यांदा रुचिताशीच वाद घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या तिघांची एंट्री मुख्य दरवाजाऐवजी शॉर्टकट मार्गाने करण्यात आली. त्यांना ‘पॉवर की’ देण्यात आली असून थेट कॅप्टन्सीच्या उमेदवारीची संधीही मिळाली आहे.

बिग बॉसचं घर सध्या ‘बीबी हॉटेल’मध्ये रूपांतरित करण्यात आलं असून नव्या स्पर्धकांना व्हीव्हीआयपी गेस्टचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या निर्णयानुसार रुचिता आणि सागर यांना पहारेकरी, तर विशाल आणि तन्वी यांना सेवक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.