Bigg Boss Marathi 6 puppet task nomination: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) सहावा सिझन ट्विस्ट अँड टर्न्स तसेच मनोरंजनाने परिपूर्ण आहे. बिग बॉसच्या घरात सध्या ड्रामापासून भांडणापर्यंत सगळं काही एकाच शोमध्ये पाहायला मिळत आहे. कधी भांडणाचा तडका, तर कधी प्रेमाने फुललेला क्षण. काही स्पर्धकांमध्ये प्रेम जुळले होते, असे क्षण देखील आपण पाहिले. सध्या बिग बॉस मराठीमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. 17 स्पर्धकांपासून सुरु झालेला हा प्रवास, यातून बरेच एलिमिनेट झाले. यात एकूण 4 स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आता बिग बॉसच्या घरात केवळ 10 स्पर्धक राहिले आहेत.
10 सदस्य राहिल्यामुळे घरात चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 22 मार्चला संस्कृती साळुंकेला (Sanskruti Salunke) बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला. तिनं या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) म्हणून प्रवेश केला होता. पण अल्पवाधितच तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता आठवड्याच्या सुरुवातीलाच या घरातून कोण बेघर होणार? अशी चर्चा रंगली आहे. अकराव्या आठवड्यात कुणाचा पत्ता कट होणार? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
इन्स्टाग्रामवर कलर्स मराठीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नॉमिनेश टास्क देण्यात आला आहे. कटपुतळी असे टास्कचे नाव आहे. जे स्पर्धक इतरांच्या हातातील कटपुतळी असतात, त्यांना या ठिकाणी नॉमिनेट करायचे, असा हा टास्क आहे. जे स्पर्धक नॉमिनेट होतील, त्यापैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बेघर व्हावं लागेल.
या टास्कमध्ये स्पर्धक एकमेकांना नॉमिनेट करतात. परंतु, प्रोमोमध्ये दिपाली सय्यदचाच चेहरा दिसत आहे. तिला कटपुतळी बनवण्यात आलंय. राखी सावंत आणि अनुश्री या दोघींनी दिपालीला नॉमिनेट केलं. यावेळी राखी आणि दिपालीमध्ये वाद झाला. दोघेही एकमेकांशी भांडतात. दरम्यान, दिपालीला नॉमिनेट केल्यामुळे ती या आठवड्यात घरातून बेघर होईल का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कलर्स मराठीने याचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोला त्यांनी, 'इतरांच्या हातातील कटपुतळी बनलेले स्पर्धक नॉमिनेट होणार, कोण वाचणार, कुणाचा गेम ओव्हर होणार?', असं कॅप्शन दिलं आहे.
