Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता शेवटच्या टप्प्यात जातोय. अवघ्या काही दिवसांचा खेळ राहिलेला असताना TOP 5 च्या रेसमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान शनिवारच्या भागात वादळी एन्ट्री ठरलेली राखी सावंतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला आहे. आता बिग बॉसच्या घरात 6 स्पर्धक उरले आहेत. आज रविवारच्या भागात राखीनंतर होणाला घरचा रस्ता धरावा लागणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
राखीनंतर कोण जाणार घराबाहेर?
बिग बॉसच्या घरात उरलेल्या 6 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने, राकेश बापट आणि रेवा कौरासे यांचा समावेश आहे. या आठवड्यात राखी, विशाल , दिपाली, अनुश्री आणि राकेश हे पाच जण नॉमिनेट झाले होते. यापैकी आता राखीचा पत्ता कट झालाय. तिकीट टू फिनले मिळवत top 5 मध्ये गेल्याने तन्वी कोलते बिग बॉसच्या घरातील पहिली फायनलिस्ट ठरलीय. दुसरीकडे रेवा कौरसे या आठवड्यात नॉमिनेट नव्हती त्यामुळे ती सुरक्षित आहे. ती दुसरी फायनलिस्ट असल्याची चर्चाय. त्यामुळे आता दिपाली, विशाल, अनुश्री आणि राकेश यांच्यापैकी कोण घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अधिकृत निकाल हा भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये जाहीर होणार आहे. या आठवड्यात नेमका कोणता स्पर्धक बाद होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, या आठवड्यात राकेशला सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याच्यानंतर अनुश्रीला जास्त मते मिळाली आहेत. तर, दिपाली सय्यद ही तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच बॉटम 2मध्ये राखी आणि विशाल कोटियन होते. विशालला काही दिवसांपूर्वी बिग बॉसने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो संपूर्ण सिझन नॉमिनेट असणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक बाद होणार, हे लवकरच भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये उघड होईल.
राखी सावंत घराबाहेर
संपूर्ण घराला आपल्या तालावर नाचवणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी, घरातली सर्वात चर्चेत असणाऱ्या स्पर्धकानं घराचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये झळकलेली टीआरपी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) घराबाहेर पडली आहे.
