Sanskriti Salunke eviction news BB Marathi: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली.  बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत आहेत.  या घरात अनेक तगड्या स्पर्धकांची एक्झिट झाली. ड्रामा क्विन राखी सावंतनंतर 3 स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. तिन्ही स्पर्धक हे घरातील स्पर्धकांना तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सिंगर प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉसच्या घरातून बेघर झाली होती. दरम्यान, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत.

बिग बॉसचं घर सध्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे.  काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांची एन्ट्री होताच घरातील समीकरणं बदलली होती.  या आठवड्यात एकूण सात सदस्य  नॉमिनेट झाले असल्याची माहिती आहे.  ज्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांचाही समावेश आहे.  रेवा कौरासे,  दीपाली सय्यद, विशाल कोटियन, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके  यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. 

माहितीनुसार, भाऊच्या धक्क्यावर   होस्ट रितेश देशमुख नॉमिनेट सदस्यांच्या नावांची घोषणा करुन, कोण घरातून बेघर होणार? याची देखील माहिती देणार आहेत.  दरम्यान, कोण घरातून बेघर होणार? हे लवकरच उघड होईल. मात्र, एलिमिनेशनपूर्वीच  सात नावांपैकी एका नावाची प्रचंड चर्चा आहे.  या घरातून जी व्यक्ती बेघर होणार आहे, या गोष्टीचा प्रेक्षकांना दु:ख नाही तर आनंद झाला आहे. कारण अगदी बिग बॉस घरातील पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीचा खेळ दिसला नाही.  

 

बिग बॉस मराठीशी संबंधित काही  पेज, सोशल मीडिया अकाऊंट आणि रेडिटवरील चर्चांनुसार, बिग बॉसच्या घरातून संस्कृती साळुंके बेघर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  तिनं बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती.  अवघ्या काही दिवसांत तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास हा संपुष्टात आला आहे.   तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याची अधिकृत माहिती बिग बॉसच्या रविवारच्या भागात उघड होईल.