Bigg Boss Marathi 6: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांची लिस्ट आता हळूहळू प्रोमोमधून समोर येऊ लागली आहे. अनेक इन्फ्लुएंसर, लोकप्रिय कलाकार, नृत्यांगना, फॅशन, गायक, एखादा राजकीय चेहरा असे वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आमंत्रण दिलं जातं. त्यातून काही मोजके लोक निवडले जातात. पण आता पुणे कोर्टातून बिग बॉस मराठीला लीगल नोटीस जाणार असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
एका रीलस्टारने बिग बॉसच्या विरोधात आवाज उठवला आहे. बिग बॉस कडून स्वतः शोसाठी बोलवण्यात आलं होतं. पण आता आमची लिस्ट फायनल झाली आहे असं ऐनवेळी सांगून जाण्या येण्याच्या खर्चाचे पैसेही न दिल्याचा आरोप या रील स्टारने केला आहे. मला शो मध्ये का घेतलं नाही? असा सवालही त्यांनी केलाय. तुमच्यासारखे 200-400 लोक आम्ही बोलावतो असं म्हणत बिग बॉसकडून सांगण्यात आलं. मराठी माणसाची अशी किंमत करता का? असं म्हणत हा कलाकार चांगलाच भडकलाच दिसतंय. महेश मोटे असे या इन्फ्लुएन्सरचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय?
बिग बॉसचे स्पर्धक निवडण्याआधी बिग बॉस कडून अनेक इन्फ्लुएंसर, रील स्टार, कलाकार, गायक, संगीतकार, नृत्यांगनांना मेल गेला होता. यातून अनेक कलाकारांसोबत क्रियेटिव्ह मिटींग झाली. या मीटींगसाठी अनेकांना इन्व्हाइट होतं. यातच रीलस्टार महेश मोटे यांचंही नाव होतं. बिग बॉसमध्ये इन्व्हाईट मिळाल्यानंतरच्या या प्रक्रियेत महेश मोटे यांना सांगण्यात आलंकी आता लिस्ट फायनल झाली आहे. त्यामुळे तुम्हाला घेता येणार नाही. यावर महेश मोटे यांनी बिग बॉसला विनंती केली की माझा वेळ गेला आहे . मला किमान जाण्या-येण्याचा खर्च तरी द्या. पण बिगबॉसने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे हा रीलस्टारने थेट कोर्टाची पायरी चढली आहे. पुणे कोर्टातून बिग बॉस मराठी ला लीगल नोटीस जाणार असल्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला आहे.
काय म्हणाला रीलस्टार महेश मोटे?
' बिग बॉस मराठीने महेश मोटेला हलक्यात घेतलं. आता महेश मोटे बिग बॉस मराठीला असा इंगा दाखवतोय. मी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये जाऊन बिग बॉस मराठीवर लीगल केस दाखल करतोय. नंतर पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन बिग बॉसचा खरा खोटा चेहरा मी उघड करणार आहे. यात सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर काढणार आहे, असं रील स्टार महेश मोटे यांनी सांगितलंय. '
महेश मोटे हे नाव वादविवाद कॉन्ट्रोवर्सीशी निगडित असणारे नाव आहे. तरीही लोकांच्या गरीबीची जाणीव असणारा व्यक्ती आहे. महेश मोटेला बिग बॉस मराठीतून स्वतःहून निमंत्रण आलं. त्या लोकांनी निमंत्रण दिलं.पण प्रक्रियेमध्ये या व्यक्तीला का वगळण्यात आलं याचं कारण योग्यरित्या स्पष्ट होणं आवश्यक आहे. एक गरीब माणूस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होता . तिथे बोलवण्यात आलं पण घेतलं नाही. याबाबतीत बिग बॉस ने त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर बिग बॉसच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असं रील स्टार महेश यांचे वकील वाजिद खान यांनी सांगितलं.
