Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच घर म्हणलं की भांडण, राडे, मैत्री, शत्रुत्व आणि एकमेकांचे गॉसिप हे काही नवीन नाही. 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठीचा 6वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे कुणाचे गट पडणार? कोणात मैत्री होणार कुणात शत्रुत्व वाढणार याची.  पहिल्याच दिवशी बिग बॉसचा आदेश न ऐकल्याने स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या दरवाजे बंद होणार आहेत. तर दुसरीकडे पहिल्याच दिवशी घरातील दोन स्पर्धकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं बिग बॉसच्या घरात? जाणून घ्या...

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

कलर्स मराठीने बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये करण सोनवणे आणि रुचिता जामदार हे गप्पा मारत बसलेले असतात. करण रुचिताला म्हणतो, आपण जेव्हा स्विमिंग पूल मध्ये जातो तेव्हा थोडं पाणी पितोच ना!.. पुढे तो फालतू मध्ये असं म्हणत काहीतरी अभिनय करून दाखवतो तेवढ्यात दोघांचे बोलणे ऐकून तनवी तिथे येते आणि म्हणते फालतू मध्ये म्हणू नकोस. यावर रुचिता लगेच म्हणते, 'कोण कधी काय बोलताय हे पहा तुम्ही ना शस्त्र घेऊन कायम तयार असता'. रुचिता आणि तन्वीमध्ये यावरून शाब्दिक चकमक झाल्याचा दिसतं. तन्वी तिला म्हणते 'तू तुझी मर्यादा ओलांडू नकोस. ' बिनडोक, तुझं तोंड शेणात घाल..' पहिल्याच दिवशी दोन स्पर्धांमध्ये जुंपल्याचं पाहून इतर स्पर्धक त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्याचेही प्रमोत दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताच कलर्स वाहिनीने पहिल्याच दिवशी रंगणार तनवी आणि रुचितामध्ये वाद असा कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला आहे.  

 

Continues below advertisement

हा प्रोमो पाहताच चाहत्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला ही सुरुवात केली आहे. ' चालू झालं एकदाच भांडण..' कोल्हापुरी दणका, उद्घाटन सोहळा झाला, पहिल्याच दिवशी राडा अशा कमेंट्स केल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांची एन्ट्री 

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात 17 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. यात तन्वी कोलते, रुचिता जामदार ,करण सोनवणे यांच्यासह दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत , विशाल कोटियन ,दिपाली सय्यद , सागर कारंडे, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, राकेश बापट ,प्रभू शेळके, अनुश्री माने ,प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर या स्पर्धकांचा समावेश आहे.