Bigg Boss Marathi Finale Twist: 'बिग बॉस मराठीच्या सहावा सिझन'चा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi 6) चा एपिसोड लवकर होणार आहे. या रिअॅलिटी शोनं प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन (Reality Show) केलं. दरम्यान, हा शो अंतिम टप्प्यावर पोहोचलेलं असताना, विजेता नक्की कोण होणार? (Entertainment News) याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता या घरात एकूण 5 स्पर्धक उले आहेत. टॉप 5 स्पर्धकांच्या शोच्या शेवटच्या प्रवासाला खास रंगत आली आहे. दरम्यान, शो शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं असताना बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली. प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा या घरात परतले आहेत. त्यांनी टॉप 5 स्पर्धकांसोबत मज्जा, मस्ती केली. यावेळी आठवणींचा जल्लोष रंगवला.
मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे पुन्हा बिग बॉसच्या घरात (BB Marathi finale week special episode)
मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे, आणि मागील सिझनचे अजून काही धुरंधर या शोमध्ये येणार असल्याची माहिती आहे. हे दमदार खेळाडू टॉप 5 स्पर्धकांना भेटले असून, त्यांनी खेळावर भाष्य केलं आहे. तसेच महत्त्वाचे सल्ले दिले आणि त्यांच्या प्रवासातील काही खास क्षण पुन्हा जिवंत केले आहेत. त्यांच्या नजरेत या सिझनचा विजेता नक्की आहे तरी कोण? या 'धुरंधर' खेळाडूंचा आवडता स्पर्धक कोण? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉसच्या घरातील एक्स स्पर्धकांच्या मते, कोण होणार विनर..? (Who will win Bigg Boss Marathi Season 6)
मेघा धाडेने यावेळी इच्छा बोलून दाखवली. 'या सिझनची विनर मुलगी व्हावी ', असं तिने म्हटलं आहे. तिच्या मते तन्वी कोलते किंवा राकेश बापट यामध्ये विनर व्हावा. तर पुष्कराच्या मते तन्वी कोलते विनर असेल. शिव ठाकरेची इच्छा आहे विशाल कोटियनने ट्रॉफी उचलावी. या विशेष भेटीत जुन्या आठवणींना उजाळा, खेळातील अनुभव आणि जिंकण्याच्या रणनीती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे. टॉप 5 स्पर्धकांसाठी ही भेट केवळ मनोरंजन नव्हती, तर अंतिम टप्प्यात स्वतःला अधिक सिद्ध करण्याची एक प्रेरणादायी संधी ठरली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
