Bigg boss marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यात प्रचंड वादविवाद आरोप प्रत्यारोप झाले. नुकताच बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात दिव्याने जीवे मारण्याचे विधान केल्याने घरातील वातावरण प्रचंड तापलं होतं. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिव्याने पहिली पोस्ट केली आहे. यात आपल्याला खूप काही सांगायचं आहे असं तिने म्हटलं.
'भाऊचा धक्का' सुरू होण्यापूर्वी बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. घराबाहेर काढण्याआधी बिग बॉसने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिव्या तिच्या मतावर शेवटपर्यंत ठाम होती. तिनं कोणाचीही माफी मागणार नसल्याचं सांगितलं नंतर बिग बॉसने तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अचानक हकालपट्टी झाल्याने सोशल मीडियावर दिव्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या सपोर्टवर आभार मानत तिने चहात्यांना एक विनंती केलीये.
काय म्हटलंय दिव्याने?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याच्या टीमने सोशल मीडियावर एक निवेदन पोस्ट केला आहे. ती म्हणाली" आम्ही समजू शकतो, बिग बॉसच्या शो मधून दिव्या शिंदे ची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झाले आहेत. अनेकांना धक्का बसलाय. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सगळं काही आहे. आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो की कुठल्याही घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. आम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आणि आमची बाजू ही मांडू. थँक्यू. टीम दिव्या शिंदे असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आता दिव्या नेमकं कधी या प्रकरणावर भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिव्याने दिलेल्या धमकीनंतर घरात एकच गदारोळ झाला. बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच दिव्या चांगल्याच शब्दांत झापलं. नंतर दिव्या राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली. परंतु, घरातील सदस्यांची तिनं माफी मागण्यास नकार दिला. याच कारणास्तव दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली.