Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून घरातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उफाळून येऊ लागले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे संपूर्ण घरात खळबळ उडाली आहे.
वादाचे नेमके कारण काय?
प्रोमोमध्ये दिसत असल्याप्रमाणे, दिपालीने रुचिताबद्दल काहीतरी विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर दिपालीचे म्हणणे आहे, "मी तुझ्यावर बोललेली नाहीये, मी नव्हती ती!" तर दुसरीकडे रुचिता देखील मागे न हटता दिपालीला सडेतोड उत्तर देत आहे. या दोघींमधील शाब्दिक युद्ध आता कुठंवर पोहचणार हे बघूया आजच्या भागात. या भांडणामुळे घरातील इतर सदस्यही अवाक झाले असून, त्यांना नक्की कोणाची बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवीन समीकरणं बदलत असताना, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा नवा वाद घराचे वातावरण नक्कीच बदलून टाकणार आहे. रोज बदलणारी समीकरणं आणि वाढता तणाव पाहता, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा वाद पुढे काय वळण घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दीपाली आणि रुचिता यांच्यातील संवाद :
रुचिता : हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला touch केलं'.
दीपाली : मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती! मी नव्हते ती!
रुचिता : अंगावर चढू नकोस ...
दीपाली: तू बोट खाली कर ... एक मरेन
रुचिता : हा चल मार!
या वादात रुचिताने असा आरोप केला की, दिपालीने इतर सदस्यांसमोर एक स्टेटमेंट केल्याचं तिने ऐकलं होतं. यावर दिपाली संतापून स्पष्टपणे सांगते की, ते विधान तिचं नव्हतंच. वाद वाढत जातो आणि दोघीही एकमेकींवर आवाज चढवताना दिसतात. बोट दाखवणं, अंगावर येणं अशा गोष्टींमुळे हा वाद अधिकच उग्र होत जातो. दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष घरातील समीकरणं बदलणार का, की हा वाद आणखी मोठा होणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.