Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सध्या रंगात आलं आहे. बिग बॉसच्या घरातून आधी रुचिता जामदार आणि आता प्राजक्ता शुक्रे या दोन्ही टॉप सदस्य घराबाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या घरात आता नवी संकट येणार आहे. सध्या घरात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीतील या ट्विस्टमुळे सदस्यांचे टेन्शन वाढलं असलं तरी प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या आठवड्यात एकापेक्षा अधिक सदस्य एलिमिनेट होणार असल्याची हिंट बिग बॉसने दिली आहे.
बिग बॉसच्या घरात मगरीची धास्ती
बिग बॉसच्या या आठवड्यात आगळावेगळा नॉमिनेशन टास्क खेळला जाणार आहे. बिग बॉसने घरात मगर आणून ठेवलीये. आता बिग बॉसचे सदस्य मगरीच्या तोंडी जाणार आहेत. या प्रोमोमध्ये प्रभू आणि सागर कारंडे एकमेकांना तावातवाने भांडताना दिसत आहेत.
'मी इथे भजे तळायला आलो नाही' असं प्रभू सागरला म्हणताना दिसतोय. त्यावर सागरही चिडतो. तो प्रभुला म्हणतो' तू काहीही म्हणशील आणि मी ऐकून घेईल हे होणार नाही' दोघांचेही आवाज चढलेले असतात. अर्थात हा नॉमिनेशनचा टास्क असल्याने जे स्पर्धक मगरीच्या तोंडी अडकतील त्यांना एलिमिनेशनला सामोरे जावं लागणार आहे. जे सदस्य नॉमिनेट होतील त्या एकापेक्षा अधिक सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातील असं बिग बॉस म्हणताना दिसतायत. या घोषणेनंतर घरातील स्पर्धकांचे चेहरे अक्षरशः पांढरे पडल्याचा दिसते.
चहात्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...
बिग बॉसच्या या प्रोमोवर चाहत्यांनी आपापलं म्हणणं सांगायला सुरुवात केली आहे. काहीजण म्हणतात सागर प्रभुला घाबरत आहे. तर काहींनी काटा चांगला बाहेर काढा असं म्हटलं. अनेकजण तन्वीला बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. तर अनेकांना बिग बॉसला 'बिग बॉसने जे ठरवला आहे त्यांना पटापट काढून टाका आणि जो ठरलेला विनर आहे त्याला ट्रॉफी द्या असेही म्हटलं आहे.
