Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व आज संपणार आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi 6 Grand Finale) आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 100 दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडलाय. आज बिगबॉसचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे . दरम्यान, बिग बॉसच्या घरात मागच्या पर्वातील सदस्य दाखल झालेले. अभिजीत सावंतपासून अंकिता वालावलकरपर्यंत सगळ्यांनी बिग बॉसच्या घरात धमाल उडवून दिलीय. कलर्स मराठीने याबाबत अनेक प्रोमो शेअर केले आहेत. यातच बिग बॉसच्या घरातील कोकण हार्टेड गर्ल (Kokan Harted Girl) आणि बिग बॉसच्या मालवणी गप्पांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोचीही सध्या चर्चा आहे. अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) घरात प्रवेश करताच बिग बॉसलाही तिच्याशी मालवणीत बोलण्याचा मोह आवरला नाही. अंकिता आणि बिग बॉसच्या मालवणी गप्पा ऐकून प्रेक्षकांनाही आनंद झालाय.
अंकिता वालावलकर अन् बिग बॉसच्या मालवणी गप्पा
बिग बॉस मराठीचा सहाव्या पर्वाचा शेवट जवळ आला आहे. दरम्यान बिग बॉस ने मागच्या पर्वातील अनेक सदस्यांना बिग बॉसच्या घरात बोलवले होते. यात सुरज चव्हाण सह अंकिता वालावलकर आणि इतर सदस्यांनी स्पर्धकांशी गप्पा मारल्या. अंकिता बिग बॉसच्या घरात येताच तिच्या आणि बिगबॉसमध्ये मालवणीत गप्पा झाल्या. याचा एक Promo कलर्स मराठीने शेअर केला आहे.
घरात येताच अंकिता म्हणाली ' तुम्ही कसे असा, मी तुमच्यासाठी बटाट्याचे कापा आणलेली, ती बाहेरंच रव्हली. ' यावर बिग बॉसने अंकिताला मालवणीतच उत्तर दिलं. ते म्हणाले ' मी बरो असंय ' यावर अंकिता म्हणाली 'खूप दिवसांनी मालवणी ऐकान बरं वाटलं तुमच्या घरात ' यावर बिग बॉस म्हणाले ' माझ्या चेडवाचा लगीन झाला. कुणाल कसो असा ? ' बिग बॉसने अंकिताची विचारपूस केली . तीही म्हणाली 'कुणाल मस्त असा ' 'खरंतर घो कसो असा ' त्यावर ' घो एकदम मजेत असा बिग बॉस ' असं अंकितानं हसत उत्तर दिलं. ' बिग बॉसने बरा वाटला भेटून ' असं म्हणत तिच्याशी गप्पा मारल्या.
चाहत्यांच्या कमेंटस
हा प्रोमो पाहून चहात्यांनाही आनंद झालाय. 'बिग बॉसच्या सीजन पाचमधील स्पर्धक आल्याने घर कसं भरून गेलं ' असं एका युजरने म्हटलं.अनेकांना अंकिताला बिग बॉसच्या घरात पाहून आनंद झालाय. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये मालवणी गप्पा आवडल्यास कळवलं.
