Janhavi Killekar On Nikki Tamboli Arya Jadhao Fight: सध्या 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) चर्चा सुरू आहे. बिग बॉसचा सहावा सीझन (Bigg Boss Season 6) चांगलाच गाजत असला तरीसुद्धा प्रेक्षक पाचवा सीझन आणि त्यातल्या स्पर्धकांना विसरलेले नाहीत. बिग बॉसच्या नव्या पर्वात सुरू असलेली लफडी, भांडणं आणि चर्चा पाहून प्रेक्षकांना गेल्या पर्वातील गाजलेल्या भांडणांची आठवण झाली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वात गाजलेलं भांडण म्हणजे, आर्या आणि निक्की तांबोळीचं. या भांडणात आर्या जाधवनं (Arya Jadhao) बिग बॉसच्या घराच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तिला घराबाहेर काढलं होतं. त्यावेळी निक्की तांबोळीनं (Nikki Tamboli) आर्यानं तिला कानाखाली लगावल्याचा आरोप केला होता. पण, त्यावेळी नेमकं घडलेलं काय? याची उत्सुकता प्रेक्षकांना आजही लागली आहे. 

Continues below advertisement

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आर्या आणि निक्की तांबोळीमध्ये नेमकं काय घडलेलं? याचा खुलासा त्याच पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या जान्हवी किल्लेकरनं केला आहे. जान्हवीनं त्यावेळी प्रेक्षकांना न दाखवलेल्या गोष्टींबाबत सगळं सांगून टाकलं आहे.  

आर्या आणि निक्कीच्या भांडणाबाबत नेमकं काय म्हणाली जान्हवी?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातली स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली की, "हो त्यांच्यात सिरीयस झालं होतं. बिग बॉस ते टेलिकास्ट नाही करू शकतं. भांडणं सुरू होती. मी माझा डायमंड वाचवण्यात होते. तेवढ्यात या दोघींचं काय तरी मजबूत वाजलं. आणि आर्याने सनकन खेचवली. सनकन खेचली निक्कीच्या. जान्हवी शॉक होऊन म्हणाली, अगं ये रूल बिल काही आहे की नाही." पुढे बोलताना जान्हवी किल्लेकर म्हणाली की, "ती (आर्या) रागिष्ट आहे थोडीशी. पण तिने निक्कीच्या खरंच खेचली. तेव्हा थोडसं बरं वाटलं. जे मनात होतं ते कोणीतरी केलं, ते तिने केलं..."

Continues below advertisement

"ते माझ्यापण मनात होतं पण ते करू शकत नव्हते. तो मोठा रुल असतो आणि तो कधीच कोणी ब्रेक करू नये असं मला वाटतं...", असं जान्हवी किल्लेकर म्हणाली. 

नेमकं घडलेलं काय?

त्यावेळी आर्या आणि निक्कीचं भांडण फारच गाजलेलं. निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात जोरदार भांडणं झालेली. ही भांडणं इतकी शिगेला पोहोचलेली की, आर्यानं निक्कीच्या थेट कानाखाली मारली. बिग बॉसच्या घरात कोणालाही शारीरिक इजा करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच या प्रकरणानंतर आर्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले