Jahnavi Killekars Namah by Jahnavi: 'बिग बॉस मराठी सिझन 5'मधून (Bigg Boss Marathi Season 5) प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar). अभिनेत्री सोशल मीडियात (Social media) सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीचे सुरज चव्हाणसोबतचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. जान्हवी किल्लेकरने सुरज चव्हाणला भाऊ मानलं. दोघांचे व्हिडीओ व्हायरल होतात. दरम्यान, जान्हवी किल्लेकरने अलिकडेच चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज (Fashion Brand) दिली आहे. तिने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जान्हवीने स्वत:चा फॅशन ब्रँड सुरू केला आहे. त्या फॅशन ब्रँडचं नाव काय? पाहूयात.
जान्हवी किल्लेकरनं आपल्या चाहत्यांना पोस्टद्वारे गुडन्यूज दिली आहे (Jahnavi Killekar Turns Entrepreneur Launches Her Fashion Brand)
जान्हवी किल्लेकर ही सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. जान्हवी किल्लेकर खास स्वत:च्या लुक्स आणि फॅशनचीही विशेष काळजी घेते. तिचे लुक्स आणि फॅशनेबल कपडे, आऊटफिट्स व्हायरल होतात. अभिनयासोबत जान्हवी किल्लेकर आता नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ती उद्योजिका बनली आहे. 'नम: बाय जान्हवी' असं तिच्या फॅशन ब्रँडचे नाव असून, तिने फॅशन ब्रँडद्वारे नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
जान्हवी किल्लेकरने आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात देव दर्शनाने केली आहे. दर्शनासाठी अभिनेत्री मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली. तिने सिद्धीविनायकांचं दर्शन घेत आपल्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. फॅशन क्षेत्रात तिने पाऊल ठेवलं आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियात शेअर केला आहे. आपल्या फॅशन ब्रँडबाबत सांगताना अभिनेत्री व्हिडीओत म्हणाली की, 'एक नवीन सुरुवात, एका नवीन स्वप्नांची. तुमच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या स्टाईलला, नवीन ओळख देण्यासाठी मी जान्हवी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे, 'नम: बाय जान्हवी'. कारण प्रत्येक व्यक्तीची स्टाईल खास असते आणि ती स्टाईल तितकीच खास असावी, यासाठी मी हा ब्रँड घेऊन आले आहे'.
'हा केवळ एक ब्रँड नाहीये, तर एक भावना आणि स्वप्न आहे. तसेच एक नवीन ओळख आहे. त्यामुळे सर्वांनी आता 'नम: बाय जान्हवी' या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. आम्ही लवकरच नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिट्स घेऊन येणार आहोत. So Guys Stay Tuned', असं जान्हवी किल्लेकरने आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या नवीन प्रवासाला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
