Bigg Boss 20 Eveiction: सलमान खान (Salman Khan) होस्टेड रिअॅलिटी शो 'बिग बॉस 20' ची (Bigg Boss 20)  चर्चा सुरू आहे.  हा सिझन प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे.  प्रेक्षकही आवर्जून 'बिग बॉस 20' पाहत आहेत. 'बिग बॉस 20'च्या घरात प्रत्येक दिवशी ड्रामा,  वादविवाद आणि बाचाबाची पाहायला मिळत आहे.  पहिल्या आठवड्यात मेकर्सने घरातील सदस्यांना सुरक्षित ठेवलं. पण दुसऱ्या आठवड्यात मेकर्सने (Elimination) घरातील सदस्यांना मोठा झटका दिला.  व्होट्स कमी आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या शोचा पहिला एलिमिनेशन पार पडला आहे.  एका कंटेस्टेंटचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. विकेंट का वारमध्ये घरातील एका सदस्याला एव्हिक्ट करण्यात आलं आहे.  तो सदस्य नेमका कोण? पाहूयात.

Continues below advertisement

घरातून बेघर झाला हा फेमस चेहरा, कोण आहे तो? (Bigg Boss 20 Elimination Rohed Khan Evicted)

'बिग बॉस 20'मध्ये दुसरा विकेंड का वार पडत आहे. सलमान खानने विकेंड का वारमध्ये सदस्यांची शाळा घेतली. या प्रसिद्धी रिअॅलिटी शोचा पहिला एव्हिक्शन पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, रोहेद खानला बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आलं आहे. विकेंड का वारमध्ये सलमान खानने स्वत: रोहेद खान एलिमिनेट झाला असल्याची घोषणा केली. रोहेद खानचा प्रवास दोन आठवड्यांपर्यंत होता.  त्याचा प्रवास खूप छोटा होता.  त्याच्या जाण्याने घरातील इतर सदस्यांनाही मोठा धक्का बसला. 

'बिग बॉस 20'च्या घरात नॉमिनेशनवर चर्चा करण्यास सक्त मनाई आहे. तरी देखील रोहेद खान,  आसिफ खान,  स्काऊट आणि कॅप्टन यंग हे सदस्य एकत्र नॉमिनेशनबाबत एकमेकांशी चर्चा करत होते.  नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉस कठोर अॅक्शन घेण्याचे ठरवले.  यंगला कॅप्टन पदावरुन दूर ठेवण्यात आले. रोहेद, आसिफ आणि स्काऊटला थेट डेंजर झोनमध्ये टाकण्यात आले.  यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी व्होट्समुळे रोहेद खान घरातून बेघर झाला. 'बिग बॉस 20'च्या घरात रोहेद खानचा जास्त वावर दिसून आला नाही. सुरुवातीला विकेंड का वारमध्ये सलमान खानने त्याला खेळ कसा खेळावा याची कल्पनाही दिली होती. तो कोणत्याही टास्कमध्ये जास्त सक्रीय नसल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement

रोहेदचा घरातील प्रवास संपल्याकारणाने आसिफ खान, स्काऊट आता सुरक्षित झाले आहेत. दरम्यान, घरातील पहिले एलिमिनेशन झाल्यामुळे इतर 15 स्पर्धक गोंधळले आहेत. आता माही वीज, कनिका मानस अरिश्फा  खान आणि इतर उर्वरित स्पर्धकांमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार एवढं मात्र नक्की. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; सिनेमा OTTवर रिलीज होणार? संतोष डावखरेंचा हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?