Bigg Boss 19: सलमान खानच्या ' बिग बॉस 19' ग्रँड फिनाले ला आता काहीच तास उरले आहेत. गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या या खेळाकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. ट्राफिक कोण जिंकणार याच्या चर्चा रंगलेल्या असताना फिनालेच्या काहीच तास आधी विकिपीडियावर विजेत्याचं नाव लिक झाल्याचं दिसून आल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडालीय. बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज रात्री पार पडणार आहे. फायनलीस्ट मध्ये पाच स्पर्धक आहेत. गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि फरहाणा भट्ट या पाच जणांचा यात समावेश आहे. टॉप स्पर्धकांसाठी वोटिंग लाइन्स आता बंद झाल्या आहेत. पण ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याच नाव सोशल मीडियावर लिक झाल्याने चर्चा रंगल्या आहेत. विकिपीडियावर आधीच जाहीर करण्यात आलेल्या विजेत्याचा नावाचा स्क्रीन शॉट सध्या व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

फिनालेपुर्वीच विजेताचं नाव विकिपिडीयावर व्हायरल 

विकिपीडिया पेजवर बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तान्या प्रणित अमाल आणि फरहाना यांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले आहे. याशिवाय शोच्या उर्वरित स्पर्धकांना बाहेर काढण्याबाबतची माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. गौरव खन्नाच्या नावापुढे विनर लिहिल्याने चाहते ही संभ्रमात आहेत. निर्मात्यांनी गौरव खन्नाला विजेता ठरवण्याचा निर्णय घेतला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण शेवटी बिग बॉसचा खरा विनर कोण हे  काही तासातच जाहीर होणार आहे.  

Continues below advertisement

व्हायरल होत असलेल्या स्क्रीन शॉटमध्ये नेमकं काय ?

व्हायरल होत असणाऱ्या स्क्रीन शॉटमध्ये 16 लोकांची नावे दिसतायेत. यात टॉप 5 मध्ये अमाल, फरहाना, गौरव, प्रणित, तान्या असून या नावाखाली मालती शहाबाज अश्नूर, कुनिका ,मृदुल, अभिषेक, नीलम, बासीर, नेहाल, अवेज ही नावे आहेत. प्रत्येक स्पर्धकाच्या पुढे एव्हिक्टेड, इजेक्टेड, फायनलिस्ट असे लिहिले आहे. मात्र गौरव खन्नाच्या नावापुढे विनर असे लिहिण्यात आल्याने चर्चा रंगल्या आहेत.  अर्थात विकिपीडियावर कोणतीही व्यक्ती माहिती बदलू शकत असल्याने  ही माहिती अधिकृत नसते. शेवटी काही तासात बिग बॉसचा खरा विजेता कोण हे जाहीर झाल्यानंतरच तो अधिकृत होईल.

Bigg Boss 19 Finale: कुठे आणि केव्हा पाहाल?

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज, 7 डिसेंबर 2025 रोजी प्रसारित होणार आहे.

JioHotstar Live: रात्री 9 वाजता

Colors TV Broadcast: रात्री 10:30 वाजता