Continues below advertisement

Bigg Boss 19 Finale Winner : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या बिग बॉस शोच्या 19 व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) ठरला आहे. तर फरहाना भट्ट (Farhana Bhatt) हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. गौरव खन्नाने 50 लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

बिग बॉस 19 शो सलमान खानने होस्ट केला होता. चाहत्यांनी बिग बॉस 19 शोला भरभरून प्रतिसाद दिला. टीआरपी रेटिंगमध्ये हा कार्यक्रम टॉप 10 मध्ये होता. या शोमध्ये भांडणे आणि मैत्रीचे अनेक रुप पाहायला मिळाले.

Continues below advertisement

मराठमोळा प्रणीत मोरे हा टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट टॉप 2 मध्ये राहिले. तान्या मित्तल, फरहाना भट्ट, गौरव खन्ना आणि प्रणीत मोरे यांनी टॉप 4 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले होते.

धर्मेंद्रच्या आठवणीने सलमान भावूक

बिग बॉस 19 मधील दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची आठवण काढताना सलमान खान भावूक झाल्याचं दिसून आलं. धर्मेंद्र आपल्या वडिलांसारखे होते, पण यावेळी त शोमध्ये येऊ शकला नाहीत असं सलमान म्हणाला. सलमानने धर्मेंद्र यांचे कौतुक केले आणि त्याच्यासारखा दुसरा कोणताही अभिनेता नाही असं म्हणाला, धमेंद्र यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या असं सांगताना सलमानच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं पाहायला मिळालं.

बिग बॉसचे टॉप 5 स्पर्धक

बिग बॉस 19 चे टॉप पाच स्पर्धक गौरव खन्ना, प्रणीत मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट होते. सर्व स्पर्धकांनी चांगला परफॉर्मन्स केला. तान्या मित्तलने तिच्या बडबडीने भरपूर कंटेंट दिला, तर गौरव खन्नाने त्याच्या शांत आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या मनावर राज्य केलं. फरहाना भट्टचा रागीट स्वभाव आणि प्रणीतची विनोदी शैली चांगलीच गाजली. अमाल मलिक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून आलं.

अशनूर कौर देखील शोमध्ये चांगली कामगिरी करत होती, चाहत्यांना ती टॉप तीनमध्ये असण्याची अपेक्षा होती. तथापि, एका घटनेने तिला शो सोडावा लागला.