Rohit Shetty House Firing : काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक (Rohit Shetty House Firing) निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर गोळीबार (Mumbai Crime) झाला होता. याप्रकरणी आताएक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरलाताब्यात घेतल्याचीमाहिती सूत्रांनीदिलीआहे. बाबासिद्धीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मकोका (Crime) अंतर्गत प्रवीण लोणकर (Praveen Lonkar) याला अटक केली होती. तर रोहित शेट्टी प्रकरणातही गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि पैसे प्रवीण लोणकरकडून देण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. अशातच लोणकर बंधुंच्या सांगण्यावरून रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा मिळावा यासाठी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती मिळत आहे. अखेर शनिवारी रोहित शेट्टी प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा घेतल्याचे कळते. (Rohit Shetty House Firing Case)

Continues below advertisement

Mumbai Crime News : रोहित शेट्टीच्या गोळीबार प्रकरणात शुभम लोणकर व्यतिरिक्त आणखी एक नाव

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील पोलिस तपासादरम्यान एक नवी अपडेट समोर आली आहे. शुभम लोणकर व्यतिरिक्त, आरजू बिश्नोईचं नावही समोर आलं आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरजू बिश्नोई अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.

Continues below advertisement

Rohit Shetty House Firing Case : नेमकं काय समोर आलं?

1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराचा प्रकार घडला. फायरिंगपूर्वीच या गँगच्या सदस्यांनी शेट्टींच्या घरासह जुहू परिसराची सविस्तर रेकी केली होती.  रेकी त्याच स्कूटरवरून केली गेली होती, ज्याचा वापर नंतर फायरिंगसाठी केला गेला. जेणेकरून हल्ल्यानंतर सहज पळून जाऊ शकले. या योजनेनुसार, शेट्टींच्या घराबाहेर पाच राउंड फायर केल्यानंतर, अनोळखी शूटर स्कूटरवर बसून पळून गेला. नंतर तो विले पार्ले रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तिथे स्कूटर सोडला आणि ट्रेनने मुंबईतून पळून गेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :