Jay Jay Swami Samarth new actor update: मराठी मालिकेच्या विश्वात बऱ्याच मालिका आपल्या विशेष सादरीकरण, कथा किंवा पात्रांसाठी चर्चेत असतात. अशीच एक मालिका जिनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक श्रद्धेचं स्थान निर्माण केलं. ती मालिका म्हणजे, 'जय जय स्वामी समर्थ'. ही मराठी कलर्स मराठीवर आवर्जून पाहिली जाते. लोकांमध्ये सकारात्मक संदेश देणारी या मालिकेनं प्रेक्षकांमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. या मालिकेत अक्षय मुदवाडकर हे प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांमध्ये लक्षवेधी ठरली. दरम्यान, या मालिकेबाबत एक नवी अपडेट समोर येत आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार, यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेता अक्षय मुदवाडकर यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अध्यात्माचं घर तयार केलं. त्यांनी साकारलेली शांत आणि संयमी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही मालिका अगदी खरी आणि जिवंत वाटत होती. त्यांनी या मालिकेसाठी जीव ओतून काम केलं, हे त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून स्पष्ट होते. दरम्यान, 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत आता एक नवा ट्वि्स्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गेल्या 5 वर्षांपासून श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर आता प्रेक्षकांना पुन्हा या भूमिकेत दिसणार नाही. अक्षय मुदवाडकर यांच्या जागी प्रसिद्ध मराठी कलाकार श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत आता नव्या प्रसिद्ध मराठी कलाकाराची एन्ट्री होणार आहे. अक्षय मुदवाडकर यांच्या जागी मराठी अभिनेते सुनील गोडसे श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत.
श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत त्यांची एन्ट्री झालेली आहे. त्यांच्या एन्ट्रीचा पहिला एपिसोडही टेलिकास्ट झाला आहे. श्री स्वामी महाराज हे पात्र सुनील गोडसे कसे सादर करणार? हे पाहणं उत्सु्कतेचं ठरेल. दरम्यान, मालिकेत झालेल्या बदलावानंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी सोशल मीडियावर अक्षय मुदवाडकर यांनीच श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली. तर, काही प्रेक्षकांनी सुनील गोडसे यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. दरम्यान सुनील गोडसे या पात्राला कितप न्याय देतात, हे पुढील भागांतून स्पष्ट होईल.
