Chandrika Dixit reacts to Tanya Mittal Ram Sita saree controversy: बिग बॉस ओटीटी 3 फेम वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित सध्या प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच मुलाच्या संगोपनासाठी केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. तसेच तिच्या आयुष्यात मिस्ट्री मॅनची एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे. ती सध्या अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, चंद्रिका आता वादात नसून, तिनं थेट बिग बॉस फेम तान्या मित्तलवर टीकेची तोफ डागली आहे. वडा पाव गर्लनं तान्याला तिच्या कृतीवरुन झापलं आहे.
तान्यावर संतापली चंद्रिका
अलिकडेच तान्या मित्तलने निर्माती एकता कपूरसोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तान्या मित्तलने भगव्या रंगाची सुरेख साडी नेसली होती. साडीच्या पदरावर भगवान राम-सीता यांचा फोटो आहे. तिनं पापाराझींसमोर या साडीवर खास पोज देखील दिले. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावेळी रेड कार्पेटवर एकता कपूरची एन्ट्री होते. दरम्यान, तान्या मित्तल आपल्या साडीच्या पदराने एकता कपूरचं चेहरा साफ करत असल्याचं दिसत आहे. ही बाब चंद्रिकाला खटकली. यावरुन चंद्रिकाने तान्यावर टीका केली आहे.
तान्याने नेसलेल्या साडीच्या पदरावर भगवान राम आणि माता सीता यांचे चित्र आहे. हे सगळं कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. तिनं याच व्हिडिओच्या आधारे तान्यावर टीकेची तोफ डागली. चंद्रिकाने 'वाह तान्या जी..', असं म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत चंद्रिका म्हणाली, 'माझे तान्या मित्तलशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. पण जो व्हिडिओ समोर आलाय, त्यातील एक गोष्ट मला खटकली'.
'एकतर तान्या जी तुम्ही शुद्धीवर नव्हता. किंवा समोर असलेली व्यक्ती एकता कपूर आहे, म्हणून सर्व काही योग्य आहे', असं चंद्रिका म्हणाली.
'भगवान राम आणि माता सीता यांचं चित्र असलेल्या साडीच्या पदराने चेहऱ्यावरील घाम पुसला. पण तुमच्याबद्दल कुणीही अद्याप आवाज उठवलेला नाही. फक्त प्रशंसा केली आहे. पण मी तुम्हाला खरं सांगते, तान्या जी, जर मी असं केलं असतं, किंवा स्वत:चा घाम पुसला असता, तर मला मीडियावाल्यांनी पुरलं असतं. मला त्यांनी जिवंत सोडलं नसतं. पण काहीही असो, जाऊद्या.. जय श्री राम..', असं चंद्रिकाने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
