Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या फिनालेला काहीच दिवस बाकी असताना बीग बॉसच्या घरात एक एलिमिनेशन झालं आहे. पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Pandharinath Kamble) याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. 65 दिवस खेळून पॅडी कांबळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यामुळं सर्वांनाच धक्का बसलाय. बिगबॉसच्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेनं घरातून एक्झिट घेतल्यानं त्याचे जवळचे मित्रही भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 

Continues below advertisement


‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा आता 10 वा आणि अंतिम आठवडा सुरू होणार आहे. दरवर्षी हा शो 100 दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेतो. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच हा शो 70 दिवसांनी संपणार आहे.  


पॅडी बिग बॉसमधून बाहेर


बिग बॉसच्या घरातील आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला. गेल्या आठवड्यात नॉमिनेशन झालं नव्हतं, त्यामुळे प्रेक्षकांचं अंतिम आठवड्यापूर्वीच्या या टास्ककडे विशेष लक्ष होतं. बिग बॉसनं घरात असणाऱ्या आठही सदस्यांना नॉमिनेट केलं होतं. या ८ जणांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळत होती. पॅडीचा खेळही मागील काही दिवसांपासून रंगल्याचं दिसून आलं. पण अंतिम आठवड्याच्या तोंडावर पॅडीला बिग बॉसमधून निरोप घ्यावा लागला आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यानं सोशल मिडीयावर आभार मानले आहेत.


 




ही सल कायम मनात राहणार आहे...


पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी बिग बॉसच्या घरातून निरोप घेताना म्हणाला, मला फिनालेपर्यंत पोहोचता आलं नाही ही सल मनात कायम राहणार आहे.पण माझ्या प्रवासानं मी आनंदी आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील पॅडीला पूर्णपणे पाठिंबा देत भरभरुन मतं देण्याची विनंती प्रेक्षकांना केली होती. पॅडीचा खुमासदार परफॉर्मन्स पाहून अनेकांनी त्याच कौतुकही केलं होतं.






 


पॅडीच्या निरोपानं घरातल्यांचे डोळे पाणावले


पॅडीच्या बिग बॉसच्या एक्सिटनंतर घरातील त्याच्या जवळच्या सदस्यांनाही अश्रू अनावर झाले होते. पॅडीच्या ग्रुपमधील सर्वच सदस्य म्हणजेच धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत भावुक झालेले दिसले. सूरज आणि पॅडीचं मैत्रीपूर्ण नातं आपण पाहिलं. त्यामुळं पॅडी घराबाहेर पडल्यानं सर्वांचेच चेहरे पडले होते.


पॅडीच्या एक्सिटनंतर घरात उरले 7 जण


 पंढरीनाथच्या एलिमिनेशननंतर घरात फक्त 7 सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होणार हे पाहणं आता शेवटच्या आठवड्यात महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा:


Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'