एक्स्प्लोर

मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

भाषेची लकब, उच्चार आणि बोलण्याची शैली आत्मसात करण्यासाठी करणने मालवणी मित्रांची आणि सेटवरील सहकाऱ्यांची मदत घेतली. त्याच्या या मेहनतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Karan Sonawne: सोशल मीडियावरील भन्नाट विनोद आणि सहज अभिनयामुळे लोकप्रिय झालेला 'ऑरेंज ज्यूस गँग'मधील करण सोनावणे आता 'भूतम भयम्' या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात तो अस्सल मालवणी तरुणाच्या भूमिकेत दिसणार असून, पात्र पडद्यावर तंतोतंत साकारण्यासाठी त्याने खास मालवणी भाषा शिकत त्यावर मेहनत घेतली आहे. भाषेची लकब, उच्चार आणि बोलण्याची शैली आत्मसात करण्यासाठी करणने मालवणी मित्रांची आणि सेटवरील सहकाऱ्यांची मदत घेतली. त्याच्या या मेहनतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

मालवणी भूमिका कशी साकारली?

करण मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने या भूमिकेसाठी स्वतःवर विशेष मेहनत घेतली. फक्त संवाद पाठ करून न थांबता, मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची सहज शैली समजून घेण्यासाठी त्याने सातत्याने सराव केला. यासाठी त्याने आपल्या मालवणी मित्रांची, चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांची मदत घेतली. संवादांमधील प्रत्येक शब्द नैसर्गिक वाटावा, पडद्यावर कुठेही कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने अनेकदा संवादांची उजळणी करत भाषेवर प्रभुत्व मिळवलं.

भूमिकेबद्दल कारण काय म्हणाला?

याबद्दल करण सोनावणे म्हणाला, “या चित्रपटात मी साकारत असलेलं पात्र मालवणी असल्याचं समजलं, तेव्हाच मला जाणवलं की ही भाषा फक्त बोलायची नाही, तर ती जगायची आहे. सुरुवातीला मालवणीतील काही शब्द, त्यांचा उच्चार आणि बोलण्याची लय समजून घेणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. काही शब्द वारंवार चुकायचे, काही वाक्यं म्हणताना मराठीची सवय मध्ये यायची. परंतु मला ही भूमिका कुठेही खोटी वाटू द्यायची नव्हती. त्यामुळे मी माझ्या मालवणी मित्रांशी सतत बोलत राहिलो. सेटवरही जे मालवणी सहकारी होते त्यांचं बोलणं बारकाईने ऐकलं, त्यांना माझे संवाद ऐकवून दुरुस्त करून घेतले. अनेकदा एकाच संवादाचा पुन्हा पुन्हा सराव केला. हळूहळू भाषेची गोडी लागली आणि तिची सहजता अंगी आली. आज पडद्यावर स्वतःला मालवणीत बोलताना पाहाताना खूप वेगळं आणि समाधानकारक वाटतं. प्रेक्षकांनाही माझा हा प्रयत्न नक्की आवडेल, अशी मला आशा आहे. कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि ‘भूतम भयम्’मुळे मला मालवणी भाषेचं सौंदर्य जवळून अनुभवता आलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केलं आहे. नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या 24 जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि करण सोनावणे यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget