Bhojpuri Star Pawan Singh Third Marriage: भोजपुरी कलाकारांचा काही नेम नाही. त्यांचे चित्रपट, गाणी आणि डायलॉग सोशल मीडियात व्हायरल होत असतात. भोजपुरी कलाकार कोणत्या न कोणत्या  कारणामुळे चर्चेत असतात. सध्या असाच एक भोजपुरी कलाकार त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. हा भोजपुरी कलाकार तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. कलाकाराने दुसर्‍या बायकोला अद्याप घटस्फोट दिलेला नाही. कायदेशीररित्या त्यांचा काडीमोड झालेला नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भोजपुरी अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

पवन सिंह असं अभिनेत्याचे नाव आहे.  ते भोजपूरी कलाकार असून, भाजपचे नेतेही आहेत. पवन सिंह कामाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. दरम्यान, तो लवकरच तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पवन सिंह एका व्हिडिओमुळे सोशल मीडियात चर्चेत आला होता. या व्हिडिओत तो अभिनेत्रीशी  आयोग्य वर्तन करत होता.  त्यानं हजारो प्रेक्षकांसमोर अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवला होता.  यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागला.

व्हायरल व्हिडिओनंतर पवन सिंहच्या पत्नीनं उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली.  तसेच तिनं घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.  लग्न वाचवण्यासाठी तिचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचं ती म्हणाली. सध्या दोघांमध्ये घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. ही केस  न्यायालयात सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, दुसऱ्या बायकोपासून काडीमोड घेतल्यानंतर तो लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे.  यामुळे त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना अधिक जोर वाढला आहे.   

Continues below advertisement

पवन सिंह याने नुकतंच चाळीशीत पदार्पण केलं. वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पवन सिंह केक कापताना दिसत आहे. तो दारूच्या नशेत असल्याचंही दिसत आहे. मात्र, पवनच्या शेजारी एक महिलाही दिसत आहे. ती एखाद्या नवरीप्रमाणे नटली आहे.  तिनं भांगेत कुंकूही भरलं आहे. पवन सिंहनं तिच्यासोबत दुसरे लग्न केले आहे का? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.  ही महिला भोजपूरी अभिनेत्री महिमा सिंह असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा आहे. दोघे लवकर लग्नबंधनात अडकणार का? अशा चर्चांना सोशल मीडियात उधाण आलं आहे.