Bhojpuri Singer Abhishek Singh: भोजपुरी प्रसिद्ध सिंगर (Singer) अभिषेक सिंह (Abhishek singh) याच्यासंबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पहाटे त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2026 रोजी  पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान,  ही घटना घडली असल्याची माहिती आहे.  हल्लेखोरांनी अभिषेक सिंह याच्या घराबाहेरील उभी असलेल्या स्कॉर्पिओ चारचाकीवर (Scorpio) हल्ला केला.  चारचाकीच्या काचा फोडल्या.  विटा आणि दगडफेक करुन चारचाकीच्या काचा फोडण्यात आल्या.  या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  तसेच त्यांनी तीन रिकाम्या गोळ्यांचे खोके जप्त केले. या प्रकरणात परिसरात खळबळ उडाली असून, भोजपुरी संगीत विश्वात (Music Industry) खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

अभिषेक सिंहच्या घराबाहेर गोळीबार, पहाटे नेमकं काय घडलं? (Bhojpuri Singer Abhishek Singhs House Attack)

या प्रकरणात अभिषेक सिंहने, सिंगर शिवकुमार विक्कू  याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  दरम्यान, आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही. हा हल्ला नेमका कुणी घडवून आणला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.  या धक्कादायक घटनेनंतर अभिषेक सिंहने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमुळे अधिक चर्चांना उधाण आलं आहे.  त्याने पोस्टच्या माध्यमातून  दावा केला की, फायरिंग घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सापडला आहे. अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'सीसीटीव्ही फुटेज सापडला आहे.  सीसीटीव्ही फुटेज लवकरच तुमच्यासोबत शेअर केले जाईल. आमचा संशय अगदी बरोबर होता.  आता समाज आणि प्रशासन कारवाई करेल.  तुम्ही जे काही केलं आहे, खूप चुकीचं आहे', असं  पोस्टमध्ये त्याने म्हटलं.

अभिषेकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकसान झालेल्या आपल्या स्कॉर्पिओ चारचाकीचा एक व्हिडीओही शेअर केला.  फुटलेल्या काचा आणि गाडीची अवस्था बिकट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  दरम्यान, हल्ला करण्यामागे कुणाचा हात होता? हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर स्पष्ट होईल.  अभिषेक सिंहच्या मते,  सिंगर पहाटे 4:30 च्या दरम्यान,  आपल्या घरी झोपले होते.  तेव्हा काचा फुटल्याचा आवाज आला. काहींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.   आवाज ऐकू येताच  अभिषेकची झोपमोड झाली.  बाहेर येताच त्याच्या स्कॉर्पिओ गाडीचे प्रचंड नुकसान केले होते.  

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या स्कॉर्पिओ गाडीवर हल्लेखोरांनी 4-5 राऊंड फायरिंग करण्यात आली होती.  त्यानंतर चारचाकीवर विटा आणि दगडं देखील फेकण्यात आली होती.  सुदैवाने त्यावेळेस चारचाकीमध्ये कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही.   या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून,  हल्लेखोर नेमका कोण होता? हल्ला करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून  सुरू आहे. अभिषेक सिंहने दावा केला की,  शिवकुमार विक्कूसोबत आधीही वाद निर्माण झाला होता. त्याला आधीही धमकी मिळाली होती. घरावर 4-5 राऊंड फायरिंग करण्यात येईल, अशी धमकी त्याला मिळाली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Navika Kotia Ends Engagement: अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?