Actor Dinesh Lal Yadav Nirahua On Jaya Bachchan: 'जया बच्चन यांनी मला दांड्यानं मारलेलं, त्या खूप रागीट...'; सुपरस्टार अभिनेत्याचा 13 वर्षांनी खळबळजनक खुलासा
Actor Dinesh Lal Yadav Nirahua On Jaya Bachchan: मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये नव्हे तर भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Actor Dinesh Lal Yadav Nirahua On Jaya Bachchan: बॉलिवूडचे (Bollywood News) ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कधीकाळी भोजपुरी चित्रपटात (Bhojpuri Movie) काम केलेल. 2012 मध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासोबत 'गंगा देवी' या चित्रपटात दिसलेले. भोजपुरी चित्रपट उद्योगाचे सुपरस्टार दिनेश लाल यादव (Dinesh Lal Yadav), ज्यांना निरहुआ म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनीही या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. पण आता, 13 वर्षांनंतर, त्यांनी खुलासा केला आहे की, सिनेमाच्या शुटिंगवेळी जया बच्चन यांनी त्यांना छडीनं झोडपलं होतं. तसेच, त्या खूप रागीट असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये नव्हे तर भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांनी दीपक सावंत दिग्दर्शित तीन चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यामध्ये 'गंगा' (2006), 'गंगोत्री' आणि 'गंगा देवी' (2012), जे सर्व बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. यापैकी एक चित्रपट, 'गंगा देवी', अमिताभ बच्चन यांच्यासोबत जया बच्चनही या सिनेमात झळकल्या होत्या. हा अमिताभ बच्चन यांचा पहिला भोजपुरी चित्रपट होता. भोजपुरी इंडस्ट्री सुपरस्टार दिनेश लाल यादव यांनीही या चित्रपटात या दोन दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते, ज्याबद्दल आता 13 वर्षांनी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
त्यावेळी जया बच्चन यांनी भोजपुरी सुपरस्टारला छडीनं मार मार मारलेलं...
सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना भोजपुरी सुपरस्टार निरहुआनं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. त्यांनी स्पष्ट केलं की, अमिताभ बच्चन सेटवर आपुलकीनं वागायचे आणि ते फारच विनोदी होते, तर जया बच्चन खूपच रागीट होत्या... एकदा, शूटिंग दरम्यान, त्यांनी मला काठीनं मार मार मारलेलं.
भोजपुरी सुपरस्टारला जया बच्चन यांनी छडीनं झोडपलं
2012 मध्ये 'गंगा देवी' प्रदर्शित झाला. आता 13 वर्षांनंतर, चित्रपटाबद्दल बोलताना भोजपुरी सुपरस्टारनं जया बच्चन यांनी प्रत्यक्षात त्याला काठीनं मारहाण केल्याच्या घटनेबद्दल सांगितलं. याबद्दल बोलताना सुपरस्टार म्हणाला की, "एक सीन होता, ज्यामध्ये मला माझ्या पत्नीला शिव्या द्याव्या लागल्या आणि जोरात थोबाडीत मारायची होती. त्यानंतर माझी आईची भूमिका साकारणाऱ्या जया बच्चन माझ्यावर चिडून मला शिव्या देणार होत्या आणि काठीनं मारणार होत्या. पण त्यांनी मला खरंच मारायला सुरुवात केली आणि छडीनं मला मार मार मारलं. त्या खूप रागीट आहेत. त्यांनी मला दोन-तीन वेळा काठीनं मारलं..."
मला मारताना मी त्यांना थांबवलेलं, पण... : भोजपुरी सुपरस्टार
भोजपुरी सुपरस्टार म्हणाला की, "मी जया बच्चन यांना ओरडून सांगितलं की, तुम्ही मला खरंच मारताय... तर त्या म्हणाल्या की, मग तू माझ्या सुनबाईला का मारलंस? मी म्हणालो की, अहो ते फक्त नाटक होतं, शुटिंगसाठी पण तुम्ही तर खरंच मला मारताय...", पुढे बोलताना भोजपुरी स्टार म्हणाला की, "कदाचित त्यांच्याकडून मला अनावधानानं मारलं गेलं असेल, पण मला ते खूपच जोरात लागलं. पण, माझ्यासाठी मात्र तो प्रसादच होता. शेवटी, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सारख्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी किती लोकांना मिळते?"
ते माझ्यासाठी माझं दैवत : निरहुआ
भोजपुरी सुपरस्टार निरहुआ म्हणाला की, "जेव्हा मला कळलं की, मी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे, तेव्हा मी पूर्णपणे स्तब्ध झालो. ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. माझ्यासाठी ते माझं दैवत आहेत... त्यांना समोर पाहताच मला काय प्रतिक्रिया द्यावी, हे कळत नव्हतं. मला कंफर्टेबल करण्यासाठी त्यांनी मला चक्क जोक सांगायला सुरुवात केली..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























