Bharti Singh Break Silence On Divorce Rumors With Haarsh Limbachiyaa: प्रसिद्ध कॉमेडी क्वीन (Comedy Queen) भारती सिंह (Bharti Singh) आपला कॉमिक टायमिंग आणि गंमतीशीर अंदाजानं सर्वांचं मन जिंकून घेते. भारती या ना त्या कारणानं चर्चेत असते. अशातच आपल्या विनोदी शैलीनं आणि भन्नाट टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 9 वर्षांनी कॉमेडियन भारती सिंहच्या संसारात वादळ आलंय. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या वैवाहिक आयुष्यात मिठाचा खडा पडला असून दोघेही आता वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Continues below advertisement

नेहमीच मजेशीर अंदाजात चाहत्यांचं मनोरंजन करणारी भारती सिहं युट्यूबवर स्वतःचे व्हिडीओ व्लॉग करत असते. त्यातून ती तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. भारतीनं नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉगमधील तिच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. याच वक्तव्यामुळे भारती आणि हर्ष लग्नाच्या 9 वर्षांनी घटस्फोट घेत असल्याचं बोललं जात आहे. 

भारती सिंहनं नुकत्याच शेअर केलेल्या यूट्यूब व्लॉगमध्ये पती हर्ष लिम्बाचिया यांच्यासोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. तसेच, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांवरही तिनं स्पष्टपणे भाष्य केलं आहे. आपल्या नात्याचं खरं वास्तव तिनं चाहत्यांसमोर मांडत अनेक अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Continues below advertisement

भारती सिंह आपल्या व्लॉगमध्ये म्हणतेय की, "मित्रांनो, मी आता हर्षसोबत राहूच शकत नाही. कारण आता आमच्या दोघांमध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. इरिटेशन वाटायला लागलीय आणि खूप अशाही गोष्टी आहेत, ज्या हर्ष अजिबातच सहन करू शकत नाही. आमच्या नात्यात आता वादळ आलंय आणि आम्ही आता वेगळे होत आहोत... अशा अनेक गोष्टी सध्या व्हायरल होत आहेत, ज्या खरंच खूपच चुकीच्या आहेत. आम्ही वेगळं होण्याचा विचारही करू शकत नाही, कदाचित आमच्या मृत्यूनंतरही वेगळं होणार नाही... या ज्या बातम्या आहेत, त्या ऐकण्यात खूपच मजा येते की, भारती आणि हर्ष यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघेही घटस्फोट घेत आहोत... त्यांच्या नात्यात कडवटपणा... आंबटपणा... आमच्या घरात लिंबू चांगले येत नाहीयत आणि आंबटपणा? व्लॉगमध्ये बोललेल्या अनेक गोष्टी पोर्टल उचलतात... आणि वाट्टेल तशा चालवतात..." 

भारती सिंह (Bharti Singh) हिनं अशा बातम्या पसरवणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. भारती सिंह म्हणाली की, तुम्ही सारेच खूप फनी आहात... मला वाटतं की, हे सगळं करुन तुम्ही सारे चुकूनही भारती सिंह आणि कपिल शर्मा यांच्यापेक्षा पुढे निघून तर नाही ना जाणार? 

भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांनी 2017 साली गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. या दोघांना दोन मुलं असून, त्यांच्या मुलांची नावं लक्ष्य आणि यशवीर लिम्बाचिया अशी आहेत. सोशल मीडियावरही हे कुटुंब अनेकदा एकत्र दिसत असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव केला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan Relationship Rumors Thalapathy Vijay: तृषा कृष्णनने अजूनही लग्न का केलं नाही? बड्या उद्योगपतीसोबत मोडलेला साखरपुडा, राणा दग्गुबातीसोबत अफेअरच्या चर्चा अन् आता मुख्यमंत्र्यांची प्रेयसी